शेतकरी चळवळीतील जुन्या नेत्यांची आज बैठक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

औरंगाबाद - राज्यासह देशभर झालेल्या शेतकरी आंदोलनाच्या आढाव्यासाठी शेतकरी चळवळीतील जुन्या नेत्यांची बैठक शुक्रवारी (ता. 16) आयोजित करण्यात आली आहे. सर्वांच्या संमतीनुसारच आपण त्यासाठी पुढाकार घेतला असल्याचे माजी आमदार शंकरराव धोंडगे यांनी सांगितले.

शेतकरी चळवळीत जवळपास तीन दशकांहून अधिक काळ काम करीत असलेल्या व विविध ठिकाणी सक्रिय असलेल्या नेत्यांमध्ये या बैठकीच्या माध्यमातून मंथन होईल. सुभेदारी विश्रामगृहात सकाळी अकराला या बैठकीस सुरवात होईल. या बैठकीस रामचंद्रबापू पाटील, विजय जावंधिया, वामनराव चटप, मोरेश्‍वर टेंभुर्डे, किशोर माथनकर, अनिल घनवट, सरोज काशीकर, लक्ष्मणराव वडले, राम नेवले, दत्ता पवार, चंद्रकांत वानखडे, लक्ष्मणराव वंगे, अमर हबीब, कालिदास आपेट, गोविंद जोशी, गुणवंतराव हंगरगेकर, कैलास तवार, डॉ. कदम उपस्थित राहतील.

Web Title: aurangabad marathwada news old leader meeting for farmer movement