आधारभूत किंमत योजनेंतर्गत ऑनलाइन कडधान्य खरेदी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - वर्ष २०१७-१८ च्या हंगामासाठी राज्यात नाफेडतर्फे केंद्र शासनाने निश्‍चित केलेल्या हमीभावाने तेलबिया व कडधान्याची खरेदी प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ३ ऑक्‍टोबरपासून जिल्ह्यात शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी, महाराष्ट्र स्टेट को- ऑप. मार्केटिंग फेडरेशन, औरंगाबाद यांनी दिली आहे.  

शेतकऱ्यांनी खरीप २०१७-१८ हंगामातील पीकपेरा क्षेत्रानुसार (उदा. १० एकर शेतीमध्ये लागवडीनुसार सोयाबीन दोन एकर, मूग तीन एकर, उडीद दोन एकर, तूर एक एकर, ज्वारी, बाजरी, मका दोन एकर) सातबाराच्या उताऱ्याची मूळप्रत, आधारकार्ड झेरॉक्‍स, बॅंक खाते पासबुकाच्या प्रथम पानाची झेरॉक्‍स, मोबाइल नंबरची माहिती खरेदी केंद्रावर नोंदणी करावी. खरीप हंगामातील पिकासाठी एकदाच सर्व पिकाची नोंदणी करणे आवश्‍यक आहे. नोंदणी झाल्यानंतर ज्यावेळेस आधारभूत दराने खरेदी सुरू होईल त्यावेळेस शेतकऱ्यांना नोंदणी केलेल्या मोबाईल नंबरवर एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. खरेदी सुरू झाल्यानंतर खरेदी केंद्रावर धान्य कधी विक्रीसाठी आणावे यासाठीदेखील एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. सुरवातीला मूग व उडीद याची खरेदी केंद्रे नाफेडची मंजुरी मिळताच सुरू करण्यात येणार आहे.

या संस्थांमध्ये नोंदणी करता येणार
गंगापूर तालुका सहकारी खरेदी- विक्री संस्था मर्यादित लासूर स्टेशन, लासूर स्टेशन बाजार समिती, औरंगाबाद तालुका शेतकरी सहकारी खरेदी- विक्री संघ मर्यादित औरंगाबाद, औरंगाबाद बाजार समिती, वैजापूर तालुका सहकारी खरेदी- विक्री संघ मर्यादित, वैजापूर बाजार समिती या ठिकाणी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Web Title: aurangabad marathwada news online grain purchasing