पोलिस आयुक्तांची खुर्ची जप्त करण्याचा आदेश

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - पोलिसांच्या वाहनामुळे झालेल्या अपघातातील भरपाईची रक्कम अदा करण्याचा न्यायालयाने आदेश दिला होता; मात्र आदेशानंतर वर्ष उलटले तरी भरपाईची रक्कम संबंधिताला अदा केली गेली नाही. त्यामुळे तदर्थ जिल्हा न्यायाधीश सी. एस. दातीर यांनी औरंगाबादच्या पोलिस आयुक्तांची खुर्ची, टेबल व इतर कार्यालयीन साहित्य जप्त करण्याचा आदेश आज दिला.

सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांच्या वाहनामुळे अपघात होऊन 2013 मध्ये रामचंद्र भिवसने हे गंभीर जखमी झाले व त्यांचे निधन झाले होते. त्यानंतर भिवसने यांची पत्नी व मुलांनी नुकसानभरपाई मिळावी, यासाठी ऍड. विजयकुमार सरोदे यांच्यामार्फत मोटार अपघात न्यायाधिकरणात दावा दाखल केला होता. न्यायाधिकरणाने 11 जानेवारी 2016 ला दावा मंजूर करून 7 लाख 56 हजार 46 रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला होता; मात्र दाव्याच्या आदेशानंतरही प्रतिवादी पोलिस आयुक्तांनी आजपावेतो भरपाईची रक्कम न्यायालयात जमा केली नाही. म्हणून भिवसने यांनी वसुलीचा दावा दाखल केला. असे असताना पोलिस खात्याने आदेशित रक्कम जमा केली नाही. त्यामुळे तदर्थ जिल्हा न्यायाधीश यांनी पोलिस आयुक्तांची खुर्ची, टेबल, त्यांच्या कार्यालयातील खुर्च्या, टेबल, संगणक, प्रिंटर, एसी व इतर कार्यालयीन साहित्य जप्त करण्याचा आदेश दिला.

Web Title: aurangabad marathwada news police commissioner chair