पोलिस शिपाई भरतीत तोतयेगिरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

औरंगाबाद - पोलिस शिपाई पदासाठी घेण्यात आलेल्या मैदानी स्पर्धेत दोन उमेदवारांनी तोतयेगिरी केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्ह्याची नोंद झाली. दोन्ही उमेदवारांना पोलिसांनी अटक केली आहे. रमेश शांताराम दांडगे आणि अमोल लुकड वाणी अशी त्यांची नावे आहेत. चाचणीत पाच किलोमीटर धावण्याची स्पर्धा होती. या वेळी दांडगे अडीच किलोमीटरपर्यंत धावला व त्याने त्याचे टोकन वाणी याला दिले. त्यानंतर उर्वरित शर्यत वाणीने पूर्ण करत फसवणूक केली.
Web Title: aurangabad marathwada news police recruitment bogus crime