"तपोवन'सह दोन गाड्यांच्या रेल्वेडब्यात आजपासून वाढ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

औरंगाबाद - दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने तात्पुरत्या स्वरूपात काही गाड्यांच्या डब्यात वाढ केली आहे. नांदेड-मुंबई तपोवन एक्‍स्प्रेस, नांदेड-बिकानेर, साप्ताहिक एक्‍स्प्रेस, तिरुपती-शिर्डी साईनगर एक्‍स्प्रेसच्या डब्यातही वाढ झाली आहे. एक जूनपासून हा निर्णय लागू होणार आहे, अशी माहिती रेल्वे विभागातर्फे देण्यात आली.

विभागातर्फे प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला. नांदेड-मुंबई तपोवन एक्‍स्प्रेसचा एक वातानुकूलित डबा वाढविण्यात आला आहे. नांदेड येथून 30 जूनपर्यंत, तर मुंबईहून दोन जून ते एक जुलैपर्यंत हा डबा वाढविण्यात आला आहे; तसेच नांदेड-बिकानेर, नांदेड साप्ताहिक एक्‍स्प्रेस रेल्वेचा द्वितीय श्रेणीचा एक डबा वाढविण्यात आला. तिरुपती-शिर्डी साईनगर शिर्डी साप्ताहिक एक्‍स्प्रेस रेल्वेचाही द्वितीय श्रेणीचा एक डबा वाढविण्यात आला आहे. सहा जूनपासून 4 जुलैपर्यंत ही वाढ करण्यात येणार आहे.

Web Title: aurangabad marathwada news railway box increase