राजा उदार झाला अन्‌ पुलासाठी भोपळाच दिला!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

औरंगाबाद - राजारूपी राज्य सरकारने नगर रस्त्यावरील ओव्हरब्रिजच्या कामासाठी यंदा सात कोटींच्या तरतुदीची अपेक्षा असताना भोपळाच दिला आहे. महामार्गावरील या रेल्वे ओव्हरब्रिजच्या कामाला लागलेले ग्रहण यापुढेही कायम राहणार असल्याने अजून किती काळ येथे वाहतूक कोंडीच्या यातना सोसायच्या हा प्रश्न अनुत्तरित राहणार आहे. 

नगरकडे जाणाऱ्या महामार्गावर वाहतूक कोंडी रोखण्यासाठी ए. एस क्‍लबपर्यंतचा रस्ता नागरिकांच्या आंदोलनानंतर सहा पदरी केला गेला. या रस्त्यावरून आडव्या जाणाऱ्या रेल्वेरुळावर असलेला दुपदरी रेल्वे ओव्हरब्रिज मात्र रुंद झाला नाही. रेल्वे खात्याकडे २० कोटींचा भरणा केल्यावर या पुलाच्या कामाला सुरुवात होईल. यातील १३ कोटींची रक्‍कम रेल्वेच्या खात्यात जमा केली असली तरी सात कोटींची रक्‍कम अद्याप जमा होणे बाकी आहे. येथे होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात या उर्वरित सात कोटींची तरतूद होईल, अशी अपेक्षा येथील लोकप्रतिनिधींची असताना मात्र प्रत्यक्षात या कामासाठी अर्थमंत्र्यांनी भोपळाच दिला आहे. हे सरकार विकास कामांसाठी पैसाच देत नाही, ओव्हरब्रिजच्या कामासाठी यंदा एका रुपयाचीही तरतूद राज्य सरकारने केली नसल्याचे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी ‘सकाळ’ला सांगितले. त्यामुळे या रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी किती काळ राहणार, याचे उत्तर मिळणे आता कठीण झाले आहे.

काय आहे सद्यःस्थिती?
नागरिकांच्या आंदोलनानंतर संरक्षण मंत्रालयाने या रस्ता रुंदीकरणासाठी जागा दिल्यावर ही वाट सहापदरी करण्यात आली. गेली अनेक वर्षे या रस्त्यावरील पूल हा अरुंदच राहिल्याने सहापदरी रस्त्यावरून येणारी वाहने येथे तासन्‌तास कोंडी करतात. या कोंडीत अनेकदा ग्रामीण भागातील रुग्णांनाही पडावे लागते. वाळूज औद्योगिक वसाहतीतून शहरात येणाऱ्या कंपन्यांच्या गाड्यांची येथे शिफ्टच्या वेळेत कायम गर्दी होते. 

Web Title: aurangabad marathwada news railway over bridge issue