रस्त्याचे काम सुरू होताच नवनगरांच्या उभारणीकडे लक्ष - राधेश्‍याम मोपलवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

औरंगाबाद - येत्या ऑक्‍टोबरपर्यंत समृद्धी महामार्गाच्या कामाला सुरू करून ते ऑक्‍टोबर २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय ठरवून वाटचाल सुरू आहे. रस्त्याच्या कामाला सुरवात होताच या महामार्गालगत नवनगरांच्या उभारणीची प्रक्रिया लगोलग हाती घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्‍याम मोपलवार यांनी ‘सकाळ’शी बोलताना ही माहिती दिली. 

शहरात आल्यावर त्यांनी रविवारी (ता. १६) ‘सकाळ’शी संवाद साधला. ते म्हणाले, की रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांशी चर्चा करुन नवनगरांच्या उभारणीवर काम केले जाणार आहे. या रस्त्यासह तयार करण्यात येणाऱ्या इंधनाच्या पाईपलाईन आणि ऑप्टिकल फायबर नेटवर्कचाही यालगतच्या परिसराला फायदा होईल.

शेतकरी जमिनी देण्यासाठी विरोध करत असतील तर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी याविषयी चर्चा केली जाणार आहे. शेतकऱ्यांमध्ये सध्या संभ्रम निर्माण केला जात आहे. ज्यांच्या जमिनी यात जात नाहीत, तेच विरोध करण्यात आघाडीवर असल्याचे श्री. मोपलवार यांनी सांगितले. दर आणि जमिनींचा मिळणारा मोबदला हा औरंगाबादेत डीएमआयसीसाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनींपेक्षा चांगला आहे. समृद्धीच्या कामासाठी ३३ कंपन्यांनी तयारी दाखवली होती. त्यातील तीन कंपन्या पात्र ठरल्या आणि सात कंपन्या या अटी-शर्तींसह पात्र ठरल्या होत्या. याशिवाय १७ कंपन्या अपात्र ठरल्या आहेत. यासाठी अजून कंपन्या तयारी दाखवतील आणि समृद्धीच्या कामाला सुरवात होईल.
 
पुलिंगपेक्षा पैशांच्या व्यवहारावर भर
समृद्धी महामार्गाच्या उभारणीत शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेण्यापेक्षा त्यांना भागीदार करुन घेण्यासाठी लॅण्ड पुलिंगची संकल्पना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पुलिंगसाठी प्रतिसाद मिळत असला तरी अनेक शेतकऱ्यांच्या मनात याविषयी गैरसमज असल्याने जमिनीचा व्यवहार करुन त्या बदल्यात शेतकऱ्यांना पैसे देण्यावर सध्या भर देण्यात येतो आहे, त्यासाठी शेतकरी तयारी दाखवत असल्याचे मोपलवार यांनी यावेळी सांगितले.

Web Title: aurangabad marathwada news road work begins, focus on the construction of new towns