आरटीई प्रवेशासाठी मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

औरंगाबाद - शैक्षणिक वर्ष २०१७-१८ ची आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबवण्यात आली. या प्रक्रियेच्या पाच फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, जिल्ह्यातील २५ टक्के प्रवेशाच्या बऱ्याच जागा रिक्त असल्याने पालकांकडून नवीन अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविण्यात यावी, असे शिक्षण संचालक (प्राथमिक) शिक्षण संचालनालय, पुणे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

त्याअनुषंगाने जिल्ह्यातील पालकांना १ ते ५ जुलैदरम्यान आपल्या पाल्याची www.rte२५admission.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. या संकेतस्थळावर जिल्ह्यांतर्गत (मनपा व ग्रामीण क्षेत्र) स्थापन केलेल्या मदत केंद्रांची यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दिलेल्या मुदतीत नोंदणी करणे अपेक्षित असून येत्या काळात कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नसून नोंदणी करताना पालकांनी आपल्या परिसरातील शाळा पाल्याच्या दृष्टीने सोयीस्कर असल्याची खात्री करूनच नोंदणी करावी, असे पत्रकात स्पष्ट करण्यात आले.

पालकांनी या केंद्रावर साधावा संपर्क
ऑनलाईन प्रवेशासाठी व अधिक माहितीकरिता पालकांनी शहरातील आ. कृ. वाघमारे, औरंगपुरा, शिशुविकास मंदिर, श्रेयनगर, महात्मा फुले प्राथमिक शाळा पदमपुरा, बळीराम पाटील प्राथमिक शाळा सिडको, शिवाजी प्राथमिक शाळा खोकडपुरा, सेंट फ्रान्सीस डिसेल्स प्राथमिक शाळा, जालना रोड, महाराष्ट्र हिंदी विद्यालय, शहागंज, सुशीलादेवी देशमुख प्रा. शा., रामनगर, स्वामी विवेकानंद शाळा, एमआयडीसी, चिकलठाणा, एसबीओए शाळा हडको व पंचायत समिती औरंगाबाद या केंद्रांवर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी केले आहे.

एकूण शाळा- ४६९, झालेले प्रवेश- २६५६, उर्वरित जागा- २८६०

Web Title: aurangabad marathwada news rte admission time period increase