आजपासून ‘सकाळ ऑटो एक्‍स्पो’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

औरंगाबाद - ‘सकाळ ऑटो एक्‍स्पो’ या चारदिवसीय प्रदर्शनास गुरुवारपासून (ता. सात) अदालत रोडवरील कासलीवाल तापडिया मैदानावर प्रारंभ होणार आहे. यामध्ये शहरवासीयांना ऑटो मोटर्समधील विविध प्रकार आणि नावीन्याची माहिती व अनुभूती मिळणार आहे. याशिवाय विविध दुचाकी, चारचाकी व कमर्शियल वाहन खरेदीबरोबरच विविध बक्षिसे आणि ऑफर्स असणार आहेत.

‘सकाळ’ व चेंबर ऑफ ऑथराइज्ड ऑटोमोबाइल डिलर्स असोसिएशन व रेड एफएम (रेडिओ पार्टनर) यांच्यातर्फे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ते रविवारपर्यंत चालणार आहे. राहुल पगारिया आणि मनीष धूत यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे. 

या प्रदर्शनात तीस दुचाकी व चारचाकी कंपन्या आणि शोरूमचा सहभाग आहे. यामध्ये विविध कंपन्यांतर्फे आकर्षक ऑफर आणि विविध स्कीम्स दिल्या जाणार आहेत. प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना रोज लकी ड्रॉच्या माध्यमातून बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. अधिक माहितीसाठी ९६०४५७७२२२, ९८२३११११६६ यावर संपर्क साधावा, तसेच प्रदर्शनात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.  

सहभागी कंपन्या व शोरूम
धूत ह्युंदाई, मारुती सुझुकी, सतीश मोटर्स, शरयू टोयोटा, नेक्‍सा सेव्हन हिल्स पगारिया ऑटो, एसकेवायएस ऑटोमोबिल, पगारिया ऑटो सुपर कॅरी, एसबीआय बॅंक लि., रत्नप्रभा होंडा, डिलक्‍स सुझुकी, एचडीएफसी बॅंक, टू-रिव्हर्स हारले डेव्हिडसन-पुणे, मोहरीर ऑटो प्रा.ली., एटीसी ऑटोमोटिव्ह, एसटीसी मोटर्स यांचा प्रदर्शनात सहभाग असणार आहे.

स्वातंत्र्यकाळातील वाहने पाहण्याची संधी 
स्वातंत्र्यकाळात प्रसिद्ध असलेल्या बॅन्टम (Bantam) १२५ सीसी असलेली दुचाकी आणि बीएसए ही ३५० सीसीची दुचाकी प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे. यासह हारले डेव्हिडसन आणि मर्सिडिज बेन्झ हे प्रदर्शनाचे आकर्षण ठरणार आहे.

Web Title: aurangabad marathwada news sakal auto expo