मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष संभाजीराव म्हसे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा निवृत्त न्यायाधीश संभाजीराव म्हसे पाटील (वय 72) यांचे शनिवारी (ता. 2) रात्री साडेअकरा वाजता येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी (ता. 3) दुपारी नगर येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

म्हसे यांना महिन्यापूर्वी उपचारासाठी नगरहून औरंगाबाद येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना पंधरा दिवसांपूर्वी घरी सोडण्यात आले होते. मात्र दोन दिवसांनी त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचे निधन झाले.

मूळचे नगर येथील संभाजीराव म्हसे यांनी वकिली करत नंतर औरंगाबाद आणि मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम पाहिले. निवृत्त झाल्यानंतर ते ग्राहक मंचचे अध्यक्ष होते.

वर्षभरापासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न ऐरणीवर आल्यानंतर राज्य सरकारने चार जानेवारी 2017 रोजी राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड केली होती. गरजू लोकांपर्यंत आरक्षण पोचावे, यासाठी ते अभ्यास व प्रयत्न करत होते.

Web Title: aurangabad marathwada news sambhajirao mhase death