दिशाभूल करून समृद्धीसाठी संमती घेण्याचा सपाटा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

औरंगाबाद - समृद्धी महामार्गासाठी खोटी माहिती देऊन संमतीपत्र घेतली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या विरोधात विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे तक्रार देण्यात आली आहे. 

समृद्धी महामार्गासाठी खासगी वाटाघाटीने जमीन देण्यास व अन्यायकारक दरपत्रकास शेतकऱ्यांचा विरोध असतानाही खोटी आमिषे दाखवून, दिशाभूल करून संमतीपत्रावर सह्या घेण्यात येत आहेत. 

या संदर्भात वैजापूर तालुक्‍यातील हाडस पिंपळगाव, पालखेड, लासूरगाव, गंगापूर तालुक्‍यातील धामोरी, डोणगाव, कदीम टाकळी या गावांमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी दौरा केला. गावागावात तलाठी जात आहेत व ‘लगेच संमती दिली तर पन्नास टक्के जास्त रक्कम मिळेल, उशीर केला तर पंचवीस टक्के रक्कम कपात केली जाईल, अशी दिशाभूल करण्यात येत असल्याचे विभागीय आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. 

शिष्टमंडळात प्रा. राम बाहेती, भाऊसाहेब शिंदे, गणेश कसबे, पारसनाथ कोल्हे यांच्यासह शेतकऱ्यांचा सामावेश होता.

Web Title: aurangabad marathwada news samruddhi highway permission