‘सिमॅसिस लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम’ने उघडले ज्ञानाचे द्वार

‘सिमॅसिस लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम’ने उघडले ज्ञानाचे द्वार

होतकरू तरुणांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी ‘सकाळ’ माध्यम समूहाचा उपक्रम
औरंगाबाद - कुणाकडे पैसे आहेत; तर कुणाकडे संकल्पना. या सगळ्यांचा मेळ बसवून होतकरू तरुणांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या ‘सिमॅसिस लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम’च्या माध्यमातून मंगळवारी (ता. १२) ज्ञानाची दारे खुली झाली. तरुणाईला उद्योजकतेकडे नेण्यासाठी आणि स्पर्धेत टिकविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या खास अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. 

शहरातील पाच महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना मंगळवारी या उपक्रमाचा परिचय करून देण्यात आला. सीएसएमएसएस, फोस्टर डेव्हलपमेंट, एमआयटी, देवगिरी अभियांत्रिकी आणि आयसीम या महाविद्यालयांमध्ये ही माहिती देण्यात आली. या वेळी ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक संजय वरकड, युनिट हेड रमेश बोडके, ‘यिन’चे मुख्य व्यवस्थापक तेजस गुजराथी, प्राचार्य डॉ. यू. बी. शिंदे, श्‍याम माढेवार, कुणाल क्षीरसागर, डॉ. राम गुडगिला आदींची उपस्थिती होती. एखाद्या ठिकाणी नोकरी करण्यासाठी आवश्‍यक असलेले ‘इंटरप्रेनरशिप’ आणि उद्योजक होण्यासाठी आवश्‍यक असलेल्या ‘आन्तरप्रेनरशिप’चे धडे या उपक्रमामधून देण्यात येतील. 

पारंपरिक शिक्षणात पैसे आणि वेळ खर्चून चांगल्या नोकरीची शाश्‍वती नाही. पण, आज ‘स्टार्टअप’ त्याला उत्तम पर्याय आहे. त्यासाठीची चिकित्सा, चांगला सल्ला, कामाचा प्रत्यक्ष अनुभव, स्पर्धा आणि स्वप्न साकारण्यासाठी लागणारा पैसा यांची सांगड घालून ‘सिमॅसिस लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ने तरुणांसाठी ज्ञानाची नवी दारे खुली केलीत. या कार्यक्रमांच्या संयोजनाची जबाबदारी समन्वयक आकाश गायकवाड, ऐश्‍वर्या शिंदे यांनी पार पाडली. त्यांना शुभांगी मोरे, प्रियंका पठाडे, प्रदीप हुंडे, संदीप अवघड, श्रेया राय, अश्‍विनी गौतमारे आदींनी सहकार्य केले.  

कुठे संपर्क साधाल?
संपर्क क्रमांक - ९३७२२३००००
व्हॉट्‌सॲप - ९३७२२६००००
ईमेल - contact@simacesyin.com किंवा अधिक माहितीसाठी ‘सकाळ माध्यम समूह’च्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

अभ्यासक्रमाचे वेगळेपण काय?
वर्गांच्या चौकटीपलीकडे प्रशिक्षण. 
प्रात्यशिक्षकांवर आधारित शिक्षण.
ध्येयवादी विद्यार्थी, प्रशिक्षकांचा मूल्याधारित समाजनिर्मिती. 
उद्योजकतेला प्रेरणा देणारा, करिअरमध्ये फायदेशीर.
उद्योजक मेन्टॉर, मार्गदर्शक, एंजल इन्व्हेस्टर एकाच व्यासपीठावर.
सामाजिक विकास केंद्रबिंदू असलेल्या प्रकल्पांमध्ये इंटर्नशिप.

काय असेल अभ्यासक्रम ?
आठ महिन्यांच्या पहिल्या टप्प्यात प्रशिक्षणार्थींना ऑनलाइन आणि लिखित स्वरूपात प्रशिक्षण देण्यात येईल. त्यानंतर एक महिना इंटर्नशिप. उर्वरित तीन महिने वैयक्तिक मार्गदर्शनासह उद्योजकतेची सुरवात म्हणून ‘स्टार्टअप’ स्पर्धा होणार आहेत. यात नव्या संकल्पनांना उद्योग सुरू करण्यासाठी व्यासपीठ मिळण्यासाठी साहाय्य केले जाईल. यासाठी केवळ २९९९ एवढे प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. 

फोस्टर डेव्हलपमेंट कॉलेज
फोस्टर डेव्हलपमेंट महाविद्यालयात ‘सिमॅसिस लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम’ची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात यात सहभाग घेतला. महाविद्यालयाच्या सभागृहात ‘यिन’चे श्‍यामसुंदर माडेवार यांनी या उपक्रमाची माहिती देऊन त्यांच्याशी संवाद साधला. तरुणांच्या संकल्पना आणि उद्योजक होण्याच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी ज्ञानाची नवी दारे या प्रोग्राममुळे खुली झाली असून, होतकरू तरुणांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने हा उपक्रम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. ऑनलाइन आणि लिखित प्रशिक्षणाबरोबर इंटर्नशिप, वैयक्तिक मार्गदर्शन आणि ‘स्टार्टअप’ स्पर्धा या माध्यमातून तरुणांना उद्योग सुरू करण्यासाठी व्यासपीठ मिळवून दिले जाईल, असे श्री. माडेवार म्हणाले.

एमआयटी महाविद्यालय 
एमआयटी महाविद्यालयात मंगळवारी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘सिमॅसिस लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची माहिती देण्यात आली. विद्यार्थी, विद्यार्थिनींनी तुडुंब भरलेल्या सेमिनार हॉलमध्ये ‘यिन’चे मुख्य व्यवस्थापक तेजस गुजराथी यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे याबाबतची माहिती देऊन त्यांच्याशी संवाद साधला. 
या कार्यक्रमाला ‘एमआयटी’चे महासंचालक मुनीष शर्मा, प्राचार्य नीलेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. शर्मा यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ‘सकाळ’च्या उपक्रमाची प्रशंसा केली. इन्तापिनर्स आणि अंत्रापिनर्स यातील फरक सांगणाऱ्या हर्षिका चोप्रा या विद्यार्थिनीचे कौतुक करून श्री. गुजराथी यांनी तिचा सत्कार केला. शुभांगी मोरे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी अक्षय स्वामी, शुभम भुमरे, गीता तायडे, जया सरकटे आदींनी सहकार्य केले.

आयसिम महाविद्यालय 
आयसिम महाविद्यालयात मंगळवारी ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या ‘सिमॅसिस लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची माहिती देण्यात आली. विद्यार्थी, विद्यार्थिनींनी तुडुंब भरलेल्या सेमिनार हॉलमध्ये राम गुडजिला यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे याबाबतची माहिती देऊन त्यांच्याशी संवाद साधला. इंजिनिअरिंग क्षेत्रात मशीन निर्माण करण्याऐवजी माणूस बनविणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. इंटरनेटमुळे आपण भौगोलिक एक झालो तर व्हर्च्यूअली एक झालो आहोत, असेही ते म्हणाले. कार्यक्रमासाठी प्रा. जहागीरदार, संजय देशमुख, प्रणव बनसोडे, श्रीमती वाबळे, श्री. जंजाळ, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा. स्वप्नील कुलकर्णी, धीरज पवार यांच्यासह विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.

देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय
‘सकाळ माध्यम समूह’ ‘यिन’द्वारे विद्यार्थ्यांसोबत नेहमीच चांगले उपक्रम राबवत असते. यिन निवडणूक, यिन शिबिर यातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना खूप शिकायला मिळाले. यिन सिमॅसिस यातही विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. उल्हास शिऊरकर यांनी केले. कुणाल क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना यिन सिमॅसिसबाबत पीपीटी सादरीकरणासह मार्गदर्शन केले. या वेळी उपसरव्यवस्थापक रमेश बोडके, रवींद्र सलकोटिया उपस्थित होते.

‘सिमॅसिस’मध्ये प्राचार्यांचे स्वागत
प्रात्यक्षिकांवर आधारित रचनात्मक प्रशिक्षणातून तरुणांना, उद्योजक किंवा कार्यकुशल कर्मचारी बनविण्याची संधी देणाऱ्या लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये मंगळवारी शहरातील प्राचार्यांचे स्वागत करण्यात आले. 

‘सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर’च्या (एसआयएलसी) पुढाकाराने ‘सिमॅसिस’ आणि ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) यांच्या माध्यमातून हा लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू करण्यात आला आहे. या वेळी देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास शिऊरकर यांनी या उपक्रमाचे स्वागत करीत काळाची गरज ओळखून अभ्यासक्रम तयार केल्याबद्दल ‘सकाळ माध्यम समूहा’चे अभिनंदन केले.  कार्यक्रमाला जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सुजित मोरे, ‘एमआयटी’चे डॉ. एन. जी. पाटील, सरस्वती भुवन महाविद्यालयाचे संजय जयस्वाल, ‘एमजीएम’च्या इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे प्रणेश झोटे, छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे, डॉ. संदीप अभंग, ‘आयसीईईएम’चे संचालक प्रा. दिलीप गौर यांच्यासह अन्य प्रतिनिधी उपस्थित होते.

नवी प्रेरणा मिळाली
‘सकाळ यिन’चा हा उपक्रम प्रेरणादायी आहे. आमच्यातील कौशल्ये विकसित करण्यासाठी याचा चांगला फायदा होईल. सध्याची बाजार व उद्योगाची अवस्था आणि नवे तंत्रज्ञान याविषयी आम्हाला माहिती मिळाली. स्वत:चा उद्योग, व्यवसाय उभारण्यासंबंधी नव्या कल्पना कळाल्या.
- योगेश सोळंके, बीएचएमएस, द्वितीय वर्ष, फोस्टर डेव्हलपमेंट कॉलेज. 

यशस्वी होण्याचा मार्ग 
पारंपरिक शिक्षणाच्या जोडीला जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्‍यक असलेल्या इतर अनेक कौशल्यांबाबत या प्रोग्राममधून माहिती मिळाली. स्टार्टअपच्या माध्यमातून युवकांतील उद्योजकतेला प्रेरणा मिळेल. केवळ नोकरी करण्याचा दृष्टिकोन जाऊन व्यावसायिकता अंगी बाणवण्याच्या दृष्टीने याचा आम्हाला चांगला उपयोग होईल.
- भगवान पांडव, बीएचएमएस, चतुर्थ वर्ष, फोस्टर डेव्हलपमेंट कॉलेज.

नावीन्यपूर्ण उपक्रम 
संवादात्मक व नावीन्यपूर्ण असा हा उपक्रम आहे. सध्याच्या मार्केटची काय स्थिती आहे, कशाप्रकारचे कौशल्य आत्मसात करण्याची व त्यांना विकसित करण्याची गरज आहे. सध्याचे तंत्रज्ञान याविषयी या उपक्रमातून आम्हाला माहिती मिळाली. स्वत:चा उद्योग-व्यवसाय कसा उभारायचा हे कळले.   
- हर्षिका चोप्रा, कॉम्प्युटर सायन्स, द्वितीय वर्ष, एमआयटी कॉलेज

स्कील्सचे महत्त्व लक्षात आले
आपण लाखो रुपये खर्चून जीवनात दहा ते बारा वर्षे पारंपरिक शिक्षण घेतो. त्याच्या जोडीलाच इतर स्कील्स आवश्‍यक असतात. त्यांचे किती महत्त्व आहे, हे या कार्यक्रमातून कळले. यातून खूप काही शिकायला मिळाले. स्टार्टअप इंडिया या धोरणातून युवकांना पर्यायाने देशाला निश्‍चितच फायदा होणार आहे. 
- ऋषिकेश बुरसे, इलेक्‍ट्रॉनिक्‍स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन, द्वितीय वर्ष, एमआयटी कॉलेज

आपण थोडक्‍यात समाधान मानणाऱ्यापैकी आहोत म्हणून मागे आहोत; परंतु रिस्क घ्या, जिद्दीने काम करा, यश हमखास मिळते. आपण रिस्क घेणाऱ्या व्यक्तींच्या मागे उभे राहायला हवे. या सर्वांचा मिलाफ म्हणजे ‘यिन’चे स्टार्टअप प्रोग्राम आहे. अर्थात इंजिनिअरचे नेतृत्व करणारा हा स्टार्टअप आहे. 
- प्राचार्य डॉ. दिलीप गौर, आयसिम महाविद्यालय, वाळूज

आयडियांसाठी मदत होईल
बिझनेस करायचा असेल तर आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींवरही बारीक लक्ष असायला हवे. स्वत:च्या विकासासाठी हा चांगला उपक्रम आहे. याविषयी मी नक्‍की विचार करीन.
- सानिका जगदाळे  

‘यिन’चा कोर्स खूपच चांगला
यिन सिमॅसिस हा कोर्स विद्यार्थ्यांसाठी उपयुक्‍त ठरेल. अतिशय अल्प दरात विद्यार्थ्यांना स्वयंभू बनवण्यासाठी मदतीचा आहे. योग्य पद्धतीने कोर्स पूर्ण केल्यास याचा भावी आयुष्यात आम्हाला लाभदायी ठरेल.
- संकेत आहेर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com