महापालिकेचे मुख्यालय आता सौरऊर्जेने उजळणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

औरंगाबाद - स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत इतर कामे रखडली असली तरी सोलर सिटीअंतर्गत लवकरच महापालिकेच्या मुख्यालयाला वीज मिळणार आहे. ५३ लाख रुपये खर्च करून महापालिका मुख्यालयाच्या टप्पा क्रमांक तीन या इमारतीच्या छतावर सोलर पॅनेल बसविले जाणार आहेत. त्यातून आठ किलोवॉट वीज मिळेल. 

स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत महापालिकेने शहर सोलर सिटी म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या मुख्यालयावर सोलर पॅनेल बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ५३ लाख रुपये खर्चाच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार एका खासगी कंपनीला हे काम देण्यात आले असून, येत्या तीन महिन्यांत हे काम पूर्ण होणार असल्याचे आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी सांगितले.

शहर बसची थेट खरेदी 
स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत महापालिका शहर बससेवा सुरू करणार आहे. त्यानुसार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी म्हणजेच २३ जानेवारीला शहर बस सुरू करण्याची घोषणा महापौर नंदकुमार घोडेले यांनी केली आहे. इलेक्‍ट्रॉनिक बस खरेदी करण्याच्या सूचना महापालिकेला करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शासनाच्या रेट काँट्रॅक्‍टवर असलेल्या एजन्सीकडून २३ जानेवारीपर्यंत पाच बस खरेदी करण्यात येतील, असे आयुक्तांनी सांगितले. सुरवातीला या बस एसटी महामंडळाला चालविण्यास देण्यात येणार आहेत. त्यासाठी लवकरच एसटीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.

Web Title: aurangabad marathwada news solar power in municipal office