‘सकाळ’तर्फे आज शाडूच्या मूर्ती बनविण्याची कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - ‘सकाळ’तर्फे शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक शाडूच्या गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. रविवारी (ता. २०) सकाळी दहा ते साडेअकरा या वेळेत ‘सकाळ’ कार्यालयात ही प्रशिक्षण कार्यशाळा होईल.

शाडू मातीच्या नावाखाली फायर क्‍लेच्या गणेश मूर्ती देऊन सध्या बाजारात ग्राहकांची फसवणूक होत आहे. त्यामुळे आपल्या परिसरात आढळणाऱ्या मातीपासून मूर्ती बनविल्या जाव्यात, यासाठी ‘सकाळ’ने पुढाकार घेत या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले आहे. मूर्तिकार नारायणराव डवले आणि प्रमोद डवले विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. प्रत्येक शाळेतून निवडक विद्यार्थ्यांना यात प्रवेश दिला जाणार आहे. 

दहा वर्षांखालील आणि वरील मुलांच्या दोन गटांना स्वतंत्र प्रशिक्षण दिले जाईल. यात मातीची ओळख, वेगवेगळ्या प्रकारच्या मातीच्या मिश्रणातून मूर्तीसाठी शाडू कमावण्याची पद्धत आणि मूर्ती घडवण्याची रीत शिकवली जाणार आहे. त्यासाठी माती आणि पाणी पुरवले जाईल. प्रशिक्षणार्थींनी पाण्यासाठी मग, नॅपकिन, पुठ्ठा, ब्रश, फुटपट्टी आणि दोन-तीन आईस्क्रीम स्टिक्‍स सोबत आणायच्या आहेत.

Web Title: aurangabad marathwada news sshadu murti making workshop by sakal