मराठवाड्यातील एसटी नाशिकपर्यंत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - मुंबईतील धुवाधार पाऊस आणि विस्कळित झालेल्या रेल्वे सेवेमुळे एसटी महामंडळाच्या प्रवासी वर्गात मोठी वाढ झाली. एसटीलाही मुंबईला जाणाऱ्या गाड्या रद्द कराव्या लागल्या. मात्र नाशिकपर्यंतच्या बसगाड्यांमध्ये प्रवासी ओव्हरफ्लो झाले होते. या निमित्ताने एसटीच्या प्रवासी संख्येत चांगलीच वाढ झाली.

मुंबईमध्ये पाऊस कोसळत असल्याने प्रवाशी वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला आहे. कसाराजवळ रेल्वेगाडी घसरल्याने मराठवाड्याच्या रेल्वेसेवेवर परिणाम झाला. मुंबईला जाणाऱ्या आणि येणाऱ्या देवगिरी, नंदीग्राम एक्‍स्प्रेस रद्द केल्या. त्याचप्रमाणे जनशताब्दी एक्‍स्प्रेसही मनमाडला थांबविण्यात आली. रेल्वेगाड्या रद्द झाल्याने रेल्वेच्या प्रवाशांनी बस स्थानकात गर्दी केली. मात्र मुंबईमध्ये प्रचंड पावसाने पाणीच पाणी झाले. शहरातील रस्ते पाण्याखाली गेले. त्यामुळे रेल्वेप्रमाणे बससेवेवरही विपरीत झाला आहे. मराठवाड्यातून मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसगाड्या केवळ नाशिकपर्यंत सोडण्यात आल्या. औरंगाबाद मुंबई, पुसद मुंबई, परभणी मुंबई या गाड्या केवळ नाशिकपर्यंत सोडण्यात आल्या. रेल्वेगाड्या रद्द झाल्याने रेल्वेच्या प्रवाशांनी बस स्थानकावर गर्दी केली होती. नाशिकपर्यंत जाणाऱ्या सर्वच गाड्यांमध्ये प्रवाशांनी उभे राहून प्रवास केला. एसटीच्या उत्पन्नात मोठी वाढ झाल्याचे वरिष्ठ आगार व्यवस्थापक स्वप्नील धनाड यांनी सांगितले.

Web Title: aurangabad marathwada news st marathwada to nashik