एसटीचे लवकरच स्मार्ट कूपन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

औरंगाबाद - एसटी महामंडळातर्फे लवकरच कॅशलेस ‘स्मार्ट कूपन’ योजना सुरू करण्यात येत आहे. ठराविक रक्कम भरून घेतलेल्या स्मार्ट कार्डवर कुटुंबातील कुणालाही प्रवास करण्याची मुभा राहणार आहे. राज्य परिवहन मंडळाने कॅशलेसच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न केला आहे. संपूर्ण कुटुंबाला प्रवासासाठी वापरता येईल, अशी सुविधा देणारी कॅशलेस स्मार्ट कार्ड योजना लवकरच एसटीच्या प्रवाशांना उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. स्मार्ट कार्डमुळे सुट्या पैशांच्या अडचणीतून वाहक आणि प्रवाशांची सुटका करणे, हा महामंडळाचा उद्देश आहे.

औरंगाबाद - एसटी महामंडळातर्फे लवकरच कॅशलेस ‘स्मार्ट कूपन’ योजना सुरू करण्यात येत आहे. ठराविक रक्कम भरून घेतलेल्या स्मार्ट कार्डवर कुटुंबातील कुणालाही प्रवास करण्याची मुभा राहणार आहे. राज्य परिवहन मंडळाने कॅशलेसच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न केला आहे. संपूर्ण कुटुंबाला प्रवासासाठी वापरता येईल, अशी सुविधा देणारी कॅशलेस स्मार्ट कार्ड योजना लवकरच एसटीच्या प्रवाशांना उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. स्मार्ट कार्डमुळे सुट्या पैशांच्या अडचणीतून वाहक आणि प्रवाशांची सुटका करणे, हा महामंडळाचा उद्देश आहे. योजनेअंतर्गत ठराविक रकमेचे स्मार्ट कार्ड घेऊन त्या रकमेइतका एसटीचा कोणताही (साधी, रातराणी, हिरकणी, शिवशाही, शिवनेरी व अश्वमेध बसेस) प्रवास करता येईल. विशेष म्हणजे कुटुंब वा मित्रपरिवार कोणीही प्रवासासाठी स्मार्ट कार्ड वापरू शकतील. फक्त प्रत्येक व्यक्तीने जितका प्रवास केला तितके पैसे त्या कार्डमधून वजा होत राहतील. हे कार्ड नंतर पुनर्भरणा (रिचार्ज) करण्याचीसुद्धा सोय असून, ऑनलाइनपद्धतीने रिचार्ज करता येणार आहे.

Web Title: aurangabad marathwada news st smart coupon