सुब्रतो रॉय ‘हाजीर होऽऽऽ’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद - औरंगाबादमध्ये उभारण्यात येणाऱ्या ‘सहारा’ सिटी प्रकल्पात फ्लॅट बुक केलेल्या आणि त्यापोटी पैसे भरलेल्या ग्राहकांना फ्लॅट अथवा त्यांनी भरलेले पैसे परत न केल्याप्रकरणी जिल्हा ग्राहकमंचात तक्रार दाखल करण्यात आली होती. सुनावणीअंती व्याजासह पैसे परत करण्याच्या देण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी न केल्याप्रकरणी सहारा समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुब्रतो रॉय यांच्यासह सहा संचालकांविरुद्ध जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्यांना २३ नोव्हेंबर रोजी मंचासमोर हजर करण्याचे आदेश दिले आहेत.

याप्रकरणी अमरजितसिंग नाथराम बग्गा आणि अनिल सावे यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे मूळ तक्रार दाखल केली होती. यामध्ये सुब्रतो रॉय यांच्यासह नॉन एक्‍झिक्‍युटिव्ह संचालक स्वप्ना रॉय, ओमप्रकाश श्रीवास्तव, जॉयब्रोतो रॉय, सुशांतो रॉय आणि सीमंतो रॉय यांना प्रतिवादी करण्यात आले होते. गांधेली शिवारात ८२ एकरांवर उभारण्यात येणाऱ्या सहारा प्राइमसिटी प्रकल्पामध्ये अर्जदारांनी २०११ मध्ये फ्लॅट बुक केले होते.

त्यापोटी त्यांनी दोन लाख आठ हजार ६०० रुपये भरले. करारानुसार तीन वर्षांत घर मिळायला हवे होते; परंतु तीन वर्षांत तेथे बांधकामदेखील सुरू झाले नाही. याबाबत तक्रारदारांनी वारंवार पाठपुरावा केला आणि नंतर बुकिंगपोटी भरलेली रक्कम परत मागितली. परंतु त्यांना दाद देण्यात आली नाही. त्यामुळे ग्राहकमंचात २०१५ मध्ये तक्रार दाखल झाली. सुनावणीअंती मंचाने ८ सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशात अर्जदारांनी बुकिंगपोटी भरलेली रक्कम बारा टक्के व्याजासह आदेश दिल्यापासून तीस दिवसांच्या आत देण्याचे तसेच अर्जदाराला नुकसानभरपाईपोटी पाच हजार रुपये देण्याचे आदेश दिले.

मात्र, या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. यावर ग्राहकमंचाने ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम २७ अन्वये सहारा समूहाच्या सहा संचालकांविरुद्ध जामीनपात्र अटक वॉरंट जारी केले. यात त्यांना अटक करून २३ नोव्हेंबर रोजी मंचात हजर करावे, आरोपींनी जामिनासाठी विनंती केल्यास त्यांना २३ नोव्हेंबरला होणाऱ्या सुनावणीस हजर राहण्याच्या अटीवर १५ हजारांचा जामीन देण्यात यावा, असे आदेशात म्हटले आहे.

Web Title: aurangabad marathwada news subrata roy

टॅग्स