गांधीनगरात तलवारबाजी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

प्राणघातक हल्ल्यात तिघे गंभीर, पाच अटकेत

औरंगाबाद - गांधीनगर भागात किरकोळ वादातून तरुणावर रविवारी (ता. १६) रात्री साडेअकराच्या सुमारास तलवारीने प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात तीनजण गंभीर जखमी झाले. घटनेनंतर या भागात वातावरण चिघळले. मात्र, पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात केल्यानंतर प्रकरण शांत झाले. या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. 

प्राणघातक हल्ल्यात तिघे गंभीर, पाच अटकेत

औरंगाबाद - गांधीनगर भागात किरकोळ वादातून तरुणावर रविवारी (ता. १६) रात्री साडेअकराच्या सुमारास तलवारीने प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात तीनजण गंभीर जखमी झाले. घटनेनंतर या भागात वातावरण चिघळले. मात्र, पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात केल्यानंतर प्रकरण शांत झाले. या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. 

संदीप मदनलाल कागडा (रा. गांधीनगर) हा मजुरी काम करतो. रविवारी रात्री तो गांधीनगर येथील एका मंदिराच्या पायरीवर बसला. त्यावेळी त्याचा परिचित राहुल ऊर्फ डुड्डा राममेहर कागडा हा तेथे आला. किरकोळ कारणावरून राहुलने संदीपला शिवीगाळ केली. यामुळे त्यांच्यात वाद सुरू झाला. हे पाहून राहुलचे वडील राममेहर कागडा तलवार घेऊन पळत आले व त्यांनी संदीपच्या पोटात वार केला. यात तो गंभीर जखमी झाला. हा प्रकार  समजताच संदीपचा भाऊ नितीन कागडा व मामा गणेश चावरिया धावून आले; पण राहुलने गणेश चावरिया यांच्याही पोटात वार केला. त्यानंतर नितीनच्या डोक्‍यात लोखंडी सळईने हल्ला केला. पाठोपाठ संदीपच्या पत्नीलाही दगडाने मारहाण करण्यात आली. 

दरम्यान, शेजारी व नातलगांनी भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती समजताच, पोलिस तेथे पोचले. त्यावेळी संदीप, गणेश, नितीन हे रक्ताळलेल्या स्थितीत होते. पोलिसांनी जमावाला पांगवून कडक बंदोबस्त लावला. त्यानंतर परिस्थिती आटोक्‍यात आली. याप्रकरणी संदीप कागडाच्या तक्रारीनुसार, संशयित राहुल ऊर्फ डुड्डा राममेहर कागडा, राममेहर हरिकिशन कागडा, मनोज ऊर्फ मिन्नू हरिकिशन कागडा, करण ऊर्फ बब्बल रामपाल कागडा, अजय प्रेम कागडा, नरेंद्र राममेहर कागडा व प्रेम हरिकिसन कागडा (रा. सर्व गांधीनगर) यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न व दंगलीच्या आरोपाखाली गुन्ह्याची नोंद झाली. तपास सहायक पोलिस निरीक्षक विजय घेरडे करीत आहेत.

पाचजण तत्काळ अटकेत
नागरी सुरक्षा व घटनेची संवेदनशीलता पाहता पोलिस निरीक्षक अनिल आडे व त्यांच्या पथकाने जखमींना पोलिस वाहनातून घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी संशयित राहुल कागडा, राममेहर कागडा, मनोज व नरेंद्र कागडा यांना तत्काळ अटक केली. 

पुन्हा हल्ल्याची होती तयारी
घाटी रुग्णालयात जखमींना दाखल केल्यानंतर तेथे पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला. त्याचवेळी घाटीतील अपघात विभागात मुख्य संशयित राहुल कागडा आला. त्यानंतर तो आत घुसत असताना पोलिसांनी त्याला चाकूसह ताब्यात घेऊन अटक केली.

Web Title: aurangabad marathwada news sword attack