सिडकोत उद्योजक, व्यावसायिकाच्या फ्लॅटमध्ये चोरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

औरंगाबाद - सिडको, एन-सात भागात भरदिवसा एकाच अपार्टमेंटमधील उद्योजक, व्यावसायिकाचे चोरट्यांनी घर फोडले. उद्योजकाचे साडेबारा हजार अमेरिकन डॉलर, पासपोर्ट, एटीएमसह व्यावसायिकाचा पंधरा हजारांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. या घटना बुधवारी (ता. २८) दुपारी उघडकीस आल्या.

अमेरिकन डॉलर, पासपोर्टसह सव्वादोन लाखांचा ऐवज जप्त, व्यावसायिकाचे बारा तोळे सोने वाचले
औरंगाबाद - सिडको, एन-सात भागात भरदिवसा एकाच अपार्टमेंटमधील उद्योजक, व्यावसायिकाचे चोरट्यांनी घर फोडले. उद्योजकाचे साडेबारा हजार अमेरिकन डॉलर, पासपोर्ट, एटीएमसह व्यावसायिकाचा पंधरा हजारांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. या घटना बुधवारी (ता. २८) दुपारी उघडकीस आल्या.

अमोल रामलिंग भाले (वय ३०, रा. सिडको, एन-सात) यांचे भाऊ शहरात आल्याने भाले व त्यांचे कुटुंबीय सातारा परिसरात त्यांना भेटण्यासाठी मंगळवारी (ता. २७) गेले होते. तेथेच झोपल्यानंतर ते सकाळी सिडकोतील घरी आले. त्या वेळी त्यांनी कपाटातील रोख सत्तावीस हजार रुपये घेऊन परत घर बंद करून गेले. यानंतर अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटला लक्ष केले. घराचा कोंयडा उचकटून चोरट्यांनी कपाटाला टार्गेट केले. कपाटातील साहित्याची चाचपणी केली. त्या वेळी चांदीचे दागिने, मूर्त्या असा दहा हजारांचा ऐवज लंपास केला. फारसे काही हाती न लागल्याने चोरट्यांनी  
वरच्या मजल्यावरील विकास काकडे यांच्या फ्लॅटला लक्ष्य केले. श्री. काकडे यांची वाळूज येथे कंपनी असून, प्रोझोनजवळ कार्यालय आहे. सकाळीच ते कार्यालयात गेल्याने त्यांच्या पत्नी व मुलीने जेवणाचा डबा तयार केला व काकडे यांना देण्यासाठी फ्लॅटचे दार बंद करून त्या गेल्या होत्या. ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घरातील कपाट तोडले. आतील बारा हजार अमेरिकन डॉलर अर्थात एक लाख ६५ हजार भारतीय रुपये, एक तोळा सोने, एटीएम, पासपोर्ट, परवाना आदी साहित्य लंपास केले. त्यांच्या पत्नी घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघड झाला. दोन्ही घरांतील चोरी प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार चोरट्यांविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली.

बॅग पॅक केली म्हणून ..!
अमोल भाले यांना ३० जूनला बाहेरगावी जायचे होते, त्यामुळे त्यांनी त्यांची बॅग पॅक केली होती. या बॅगेत तब्बल बारा तोळे सोने होते. चोरट्यांनी बॅगला हात न लावल्याने सोने चोरीपासून वाचले, तसेच त्यांनी सकाळीच कपाटातून २७ हजारांची रक्कम काढून नेली होती, तेही पैसे वाचले.

Web Title: aurangabad marathwada news theft in sidko