तीन मुलांच्या अपहरणाचा संशय

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

औरंगाबाद - अनोळखी चालकाने तीन मुलांना मोटारीत बसवून नेल्याची बाब समोर आली आहे. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास शहरातील अंबिकानगर येथे घडल्याचे स्थानिक महिलांचे म्हणणे आहे. मोटारीमध्ये बसविलेली मुले आरडाओरड करून जोरजोरात रडत असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अंबिकानगर परिसरात सायंकाळी एकजण मोटारीने आला. दोन मुली व एका मुलाला मोटारीत बसविताना महिलांनी त्याला पाहिले. मुले भेदरलेली असल्याने आरडाओरड करीत होती. तसेच रडतही होती. एका महिलेने विचारणा केली असता त्या व्यक्तीने "मुले माझीच आहेत,' असे उत्तर दिले; परंतु महिलेला संशय आल्याने तिने ही बाब काही तरुणांना सांगितली. तरुणांनी मोटार अडविण्याचा प्रयत्न केला. तसेच याची माहिती परिसरात गस्तीवर असलेल्या पोलिसांना दिली. तरुणांनी मोटारीचा क्रमांक पोलिसांना दिला असून, त्याद्वारे शोध घेतला जात आहे.

मुलांची नावे व संशयित मोटारचालकाची माहिती समजू शकलेली नाही. ही तीन ते पाच वर्षांखालील होती. ती मुले त्याच व्यक्तीची होती तर ती जोरजोरात का रडत होती, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. बहुधा या मुलांचे अपहरण झाले असावे, असा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे.

Web Title: aurangabad marathwada news three child kidnapping suspect