विधीच्या तीन विद्यार्थ्यांची उपोषणात तब्येत खालावली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विधी शाखेचे विद्यार्थी सोमवारपासून (ता. दोन) उपोषणाला बसले आहेत. यातील तीन उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली असून गोपाळ पवार या विद्यार्थ्याला घाटीमध्ये दाखल केले. प्रशासनाकडून अद्याप समाधानकारक उत्तरे न आल्याने उपोषण सुरूच राहणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

विधी शाखेला प्रवेश घेतल्यानंतर परीक्षेसाठी ठरलेला कालावधी मिळावा, परीक्षेत इंग्रजीशिवाय मराठीचा पर्याय असावा, तसेच सरासरी गुणांची ५० टक्‍क्‍यांची अट रद्द करावी, या मागणीसाठी मराठवाड्यातील विधी शाखेचे विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी तीन विद्यार्थ्यांची तब्येत खालावल्याने महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक उपोषणस्थळी आले होते. उपोषण सोडण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना विनंती केली. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने मागण्या मान्य केल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली. प्रथम सत्र परीक्षेत जे अधिकारी, कर्मचारी दोषी आहेत. त्यांना निलंबित करून विद्यार्थ्यांची नुसकानभरपाई द्या, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी लावून धरली आहे. प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी सोमवारी या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती.

Web Title: aurangabad marathwada news three student fasting health