एमटीडीसीचे पर्यटकांना ‘उल्लू बनाविंग’

आदित्य वाघमारे
सोमवार, 17 जुलै 2017

पाणचक्की ते लेणीचे अंतर अवघे ४.९ किमी, दाखवले १७ किमी

औरंगाबाद - राज्याच्या पर्यटन राजधानीत भटकंतीसाठी येणाऱ्या पर्यटकांना महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या (एमटीडीसी) वतीने चक्क ‘उल्लू’ बनवण्याचे उद्योग सुरू आहेत. ऐतिहासिक पाणचक्कीलगत लावण्यात आलेल्या अन्य पर्यटनस्थळांच्या मार्गदर्शक फलकावर औरंगाबाद लेणीचे अंतर तब्बल १७ किलोमीटर दाखवण्यात आले आहे, जे ४.९ किलोमीटरच असल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले. 

अजिंठा आणि वेरूळनंतर औरंगाबादेत असलेले पाणचक्की, बिबीका मकबरा आणि औरंगाबाद लेणी हे महत्त्वाचे सर्किट आहेत. ज्या ठिकाणी पर्यटकांची कायमच रहदारी असते. केवळ राज्य नव्हे; तर देश आणि परदेशांतून येणाऱ्या पर्यटकांच्या माहितीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने शहरात अनेक ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. या सर्किटचा अविभाज्य भाग असलेल्या पाणचक्कीच्या बाहेरून एमटीडीसीच्या वतीने लावण्यात आलेल्या फलकावर पाणचक्कीपासून बिबीका मकबऱ्याचे अंतर ७ किलोमीटर, औरंगाबाद लेणीचे अंतर १७ किलोमीटर तर सोनेरी महालाचे अंतर हे तब्बल ८ किलोमीटर दाखवण्यात आले आहे. 

हे आकडे येथे येणाऱ्या पर्यटकांची दिशाभूल करणारे ठरत आहेत. ‘सकाळ’ने या अंतराची प्रत्यक्ष तपासणी केली असता या पाटीवर सांगण्यात आलेले अंतर आणि प्रत्यक्षात असलेल्या अंतरात मोठा फरक आढळून आला. प्रत्यक्षात गाडीच्या साहाय्याने केलेल्या या तपासणीत पाणचक्कीपासून मकबरा केवळ २.१ किमी, औरंगाबाद लेणी ४.९ किमी, सोनेरी महाल २.९ किमी असल्याचे आढळून आले.  

ठिकाणे                    पाटीवरील अंतर    प्रत्यक्षात अंतर
पाणचक्की ते बिबीका मकबरा    ७ किमी    २.१ किमी
पाणचक्की ते औरंगाबाद लेणी    १७ किमी    ४.९ किमी
पाणचक्की ते सोनेरी महाल    ८ किमी    २.९ किमी

Web Title: aurangabad marathwada news ullu banaving tourist by mtdc