चोर समजून केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जुलै 2017

औरंगाबाद -  चोरांचा साथीदार समजून विजय पांडुरंग सदाफुले (वय 35, रा. मिलिंदनगर, उस्मानपुरा) या तरुणाला सोमवारी (ता. 10) उस्मानपुरा भागातील प्रतापनगर येथे मारहाण झाली. त्याचा उपचारादरम्यान शुक्रवारी "घाटी'त मृत्यू झाला.

संदीप प्रकाश जोशी (रा. प्रशांतनगर, प्रतापनगर) यांच्या गोदामाशेजारी दोन तरुण चोरीच्या प्रयत्नात असल्याचे समजताच नागरिकांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी दगडफेक झाली. ही घटना पाहण्यासाठी विजय सदाफुले गेले होते; पण नागरिकांच्या कचाट्यात सापडल्यानंतर चोरांचा साथीदार समजून त्यांनाही मारहाण केली. या गडबडीत चोरीसाठी आलेले मूळ संशयित पसार झाले. याप्रकरणी विजय यांच्या पत्नी छाया सदाफुले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञाताविरुद्ध खुनाच्या गुन्ह्याची नोंद झाली. विजय यांना अश्‍विनी (14), दीपाली (12), अजय (10), रूपाली (नऊ) असे चार अपत्ये आहेत.

Web Title: aurangabad marathwada news understanding thief leads death young man