विद्यापीठ चौकशी समितीचा अहवाल अमान्य

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

औरंगाबाद - साई अभियांत्रिकीच्या गुणवाढ प्रकरणानंतर विद्यापीठ चौकशी समितीने अहवाल तयार करून पोलिस आयुक्तांना पाठविला; पण हा अहवाल आयुक्तांनी अमान्य केला आहे. या प्रकरणाची विद्यापीठाने पुनर्चौकशी करावी, अशा आशयाचे पत्र पोलिस प्रशासन विद्यापीठाला पाठविणार आहे.

औरंगाबाद - साई अभियांत्रिकीच्या गुणवाढ प्रकरणानंतर विद्यापीठ चौकशी समितीने अहवाल तयार करून पोलिस आयुक्तांना पाठविला; पण हा अहवाल आयुक्तांनी अमान्य केला आहे. या प्रकरणाची विद्यापीठाने पुनर्चौकशी करावी, अशा आशयाचे पत्र पोलिस प्रशासन विद्यापीठाला पाठविणार आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साई अभियांत्रिकी महाविद्यालयात १६ मे रोजी बीई सिव्हील द्वितीय वर्षाचा बिल्डिंग कन्स्ट्रक्‍शन या विषयाचा पेपर शिवसेना नगरसेवक सीताराम सुरे यांच्या घरी सोडविण्यात आल्या. यानंतर गुन्हे शाखा पोलिसांनी २७ विद्यार्थ्यांसह शिवसेना नगरसेवक सीताराम सुरे, साई अभियांत्रिकी संस्थाध्यक्ष ॲड. गंगाधर मुंढे, सचिव मंगेश मुंढे, प्राचार्य संतोष देशमुख, कस्टोडियन कांबळे, प्राध्यापक विजय आंधळे अशा ३३ जणांना अटक केली होती. या प्रकरणी हर्सूल ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पोलिस व विद्यापीठ पातळीवर या प्रकरणी तपास सुरू आहे. दरम्यान, विद्यापीठाने चौकशी समिती नेमली. या समितीने परीक्षा विभागातील सर्वांना क्‍लीन चिट दिली. 

हा अहवाल विद्यापीठ प्रशासनाकडून पोलिस आयुक्तांना प्राप्त झाला; पण आयुक्तांनी हा अहवाल अमान्य आहे. परीक्षा संपल्यानंतर परीक्षा केंद्रातून लगेचच उत्तरपत्रिका विद्यापीठाला पाठविण्याऐवजी दोन दिवसांनी पाठविण्यात येत होत्या, अशी माहिती चौकशीनंतर समोर आली. मुळात: परीक्षा संपताच विद्यापीठाकडे उत्तरपत्रिका हस्तांतरित कराव्यात, असे नियम आहेत. मात्र, तसे झाले नाही. उत्तरपत्रिका वेळेत विद्यापीठाच्या परीक्षा विभागात जमा न करण्यामागे नेमके दोषी कोण? त्यांची नावे द्यावीत, असे पत्र विद्यापीठाला पाठविण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी पोलिस निरीक्षक सुरेश वानखेडे यांना दिले आहेत.

Web Title: aurangabad marathwada news university inquiry committee report reject