विनोद घोसाळकरांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची भेट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - महापौर निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर शिवसेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी शनिवारी (ता. सात) शहरातील भाजप नेत्यांची भेट घेतली. महापौर निवडणुकीत युतीबाबत भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे श्री. घोसाळकर यांनी सांगितले तर ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी स्पष्ट केले. 

विद्यमान महापौर भगवान घडामोडे यांचा कार्यकाळ २८ ऑक्‍टोबर रोजी संपणार आहे. महापालिकेत शिवसेना भाजप युती असून, युतीच्या करारानुसार पुढील अडीच वर्षे महापौर पद शिवसेनेकडे राहणार आहे. मात्र, अपक्षांच्या जोरावर शिवसेनेला धक्का देण्याची व्यूहरचना भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी सुरू केली होती. शिवसेना उमेदवार कोण देणार यावर भाजपचा निर्णय अवलंबून राहणार होता. दरम्यान, शिवसेनेने अनुभवी नगरसेवक नंदकुमार घोडेले यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. श्री. घोडेले यांचा महापालिकेतील संपर्क पाहता शिवसेनेला धक्का देण्याची तयारी करणारे बॅकफूटवर आल्याचे चित्र आहे. असे असतानाच श्री. घोसाळकर यांनी शनिवारी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, श्री. बोराळकर, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांची भेट घेतली.  यावेळी महापौर निवडणुकीत युतीसाठी भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे श्री. घोसाळकर यांच्या वतीने सांगण्यात आले. मात्र श्री. बोराळकर यांनी घोसाळकर माझ्या घरी आले होते. त्यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी महापौर निवडणुकीबाबत चर्चा झाली नाही, असे स्पष्ट केले. 

भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत होणार फैसला
महापौर निवडणुकीसंदर्भात श्री. बोराळकर म्हणाले, की निवडणुकीसाठी अद्याप दोन आठवड्यांचा अवधी आहे. शिवसेना-भाजपची महापालिकेत युती असून, सध्या युतीचाच महापौर, सभापती पदावर आहे. महापौर निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाचे अद्याप आदेश आलेले नाहीत. लवकरच कोअर कमिटीची बैठक घेण्यात येणार आहे. त्यात पक्षाचा निर्णय होईल.

Web Title: aurangabad marathwada news vinod ghosalkar meet to bjp Office bearer