शटडाऊन संपला, आज मिळणार पाणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - विद्युत उपकेंद्र, जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने घेतलेला ३६ तासांचा शटडाऊन शनिवारी (ता. सात) रात्री ११ वाजता संपला असून, त्यानंतर मध्यरात्रीपासून शहरात पाणी येण्यास सुरवात झाली.

रविवारी (ता. आठ) शहरातील जलकुंभ भरल्यानंतर पाण्याचे वितरण सुरू होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले. पाण्याचे वेळापत्रक पूर्वपदावर येण्यासाठी मात्र आठवडाभराचा वेळ लागणार आहे.

महापालिकेने पैठण येथील विद्युत उपकेंद्र व इतर दुरुस्त्या करण्यासाठी शुक्रवारी (ता. सहा) सकाळी अकरापासून ३६ तासांचा शटडाऊन घेतला होता. त्यानुसार महावितरणने पैठण उपकेंद्राची वीज बंद केली. महावितरणने तीन तासांत दुरुस्तीची कामे पूर्ण केली असली, तरी महापालिकेला कामे पूर्ण करण्यासाठी ३६ तास लागले. त्यात फारोळा जलशुद्धीकरण केंद्राची स्वच्छता, पंपगृहातील ८०० मिलिमीटर व्यासाची वाहिनी बदलणे, रिसायकल युनिटची स्वच्छता, फिडरवरील १७ व्हॉल्व्हची दुरुस्ती अशी कामे शुक्रवारी करण्यात आली तर ढोरकीन येथे २४ लाख लिटर पाणी क्षमतेच्या जलकुंभ साचलेला गाळ काढण्याचे काम शनिवारी सायंकाळी पूर्ण झाले.

जायकवाडी पंपगृहात तीन ठिकाणी वेल्डिंगचे काम करण्यात आले. शहरात रेल्वेस्टेशन परिसर, पदमपुरा टाकसाळी मंगल कार्यालय, सेल्स टॅक्‍स कार्यालय या ठिकाणी वाहिनीची दुरुस्तीही करण्यात आल्या. शनिवारी रात्री नऊपर्यंत दुरस्तीची सर्व कामे पूर्ण झाली. 

सहावा पंपही सुरू
रात्री साडेअकरा ते बाराच्या दरम्यान जायकवाडी येथील पंपगृह सुरू करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांनी सांगितले. दोन दिवसांच्या शटडाऊनमुळे दोन दिवसांनी पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. ज्या भागाला शुक्रवारी पाणी मिळणार होते. त्यांना रविवारी पाणीपुरवठा होणार आहे. शनिवारी ज्या भागाचा टप्पा असेल त्यांना सोमवारी पाणीपुरवठा होणार आहे. जायकवाडी पंपगृहातील सहापैकी एक पंप बंद होता. मात्र, शटडाऊनच्या काळात महापालिकेने या पंपगृहाची दुरुस्ती केली. आता सहावा पंपही सुरू झाल्यामुळे शहराला मुबलक पाणी मिळेल.

Web Title: aurangabad marathwada news water issue