गर्भपात करणाऱ्या महिला डॉक्‍टरला अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

औरंगाबाद - दोन हजारांत सर्रास गर्भपात करण्याचा "उद्योग' चक्क एक महिला डॉक्‍टर करीत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. जिन्सीच्या महिला पोलिस उपनिरीक्षकासह एक महिला बनावट रुग्ण म्हणून डॉक्‍टरकडे गेल्या. गर्भपाताची प्रक्रिया सुरू असतानाच पोलिसांनी डॉक्‍टरला पकडले. ही कारवाई बुधवारी दुपारी करण्यात आली.

पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सांगितले, की चंद्रकला रामराव गायकवाड (वय 60, रा. राज कॉम्प्लेक्‍स, रोजाबाग) असे संशयित डॉक्‍टर महिलेचे नाव आहे. जिन्सी भागात गर्भपात शस्त्रक्रिया होत असल्याची तक्रार किलेअर्क येथील एका महिलेने थेट पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्याकडे दिली. आयुक्तांच्या निर्देशानुसार, पडताळणी करण्यासाठी मंगळवारी (ता. 23) तक्रार करणाऱ्या महिलेची भावजय व उपनिरीक्षक वर्षा काळे या दोघी बुरखा घालून जिन्सीतील गायकवाडच्या रुग्णालयात गेले. गर्भपातासाठी डॉ. गायकवाड हिने त्यांना दोन हजार रुपये मागितले. तिने दिलेल्या वेळेनुसार आज दुपारी बनावट महिला रुग्ण व वर्षा काळे बुरखा घालून रुग्णालयात आल्या.
दरम्यान, बनावट महिला रुग्णाची गर्भपात करण्याची प्रक्रिया सुरू असताना चंद्रकला गायकवाड हिला पकडण्यात आले. पोलिसांनी चौकशी केली असता, तिने आपण यापूर्वी महापालिकेत वैद्यकीय अधिकारी असल्याचे सांगितले. तसेच, एमबीबीएसचे शिक्षणही पूर्ण केल्याचा दावा तिने पोलिसांकडे केला.

Web Title: aurangabad marathwada news women doctor arrested by abortion