झूम एअरचे उड्डाण लांबले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - चिकलठाणा अंतरराष्ट्रीय विमानतळावरून ‘औरंगाबाद ते दिल्ली’ हे झूम एअरचे विमान ऑक्‍टोबरपासून उड्डाणास प्रारंभ करणार होते; मात्र अद्यापही झूम एअरने विमानतळ प्राधिकरणाशी संपर्क साधला नाही. त्यामुळे आता हे उड्डाण लांबणीवर पडले आहे. 

चिकलठाणा विमानतळावरून दिल्लीसाठी इंडियन एअरलाइन्सचे विमान रात्री आठ वाजता दिल्लीकडे रवाना होते. दिल्लीकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने दिल्लीला जाणारे विमान कायम फुल्ल असते. या विमानाने दिल्लीला जाण्यासाठी उद्योजक, देशी, विदेशी पर्यटकांची गर्दी असते. ही गर्दी लक्षात घेऊनच झूम एअरने औरंगाबाद-दिल्ली ही नवीन विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विमानतळ प्राधिकरणाशी संपर्क साधून २८ ऑक्‍टोबरपासून ही सेवा सुरू करण्याचे स्पष्ट केले होते; मात्र विमानसेवा सुरू करण्यापूर्वी किमान महिनाभर अगोदर विमानतळ प्राधिकरणाला शेड्युलिंग देणे आवश्‍यक असते; मात्र अद्यापपर्यंत कंपनीने विमानतळ प्राधिकरणाला शेड्युल दिलेले नाही. त्यामुळे ही विमान सेवा किमान ऑक्‍टोबरमध्ये तरी सुरू होऊ शकणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: aurangabad marathwada news zoom air flight