वसुलीसाठी जिल्हा परिषद ‘सीईओं’ची खुर्ची जप्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

औरंगाबाद - शाळेच्या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराला जिल्हा परिषद प्रशासनाने देणे असलेली व्याजासह प्रलंबित रक्‍कम  वसुलीसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्यात आली. निविदा विभागातील संगणकही सील करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानुसार आलेल्या पथकाने मंगळवारी (ता.१८) ही कारवाई केली. या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर बघ्यांची गर्दी झाली होती. 

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत अंधारी (ता. सिल्लोड) येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे १९८८ मध्ये बांधकाम करण्यासंदर्भातील कंत्राट टी. ए. चोपडा कन्स्ट्रक्‍शनला देण्यात आले होते. हे काम २० लाख रुपयांचे होते. प्रत्यक्ष शाळेच्या इमारतीचे बांधकाम करताना कंत्रटदाराला बांधकाम विभागातून काही अडचणी निर्माण झाल्याने शाळेच्या इमारतीचे बांधकाम रखडले. ही शाळा दोन मजली बांधण्यात येणार होती, तर चोपडा कन्स्ट्रशनने एक मजल्यापर्यंतचे बांधकाम केलेले होते. वर्ष झाले तरीही कामाला सुरवात होऊ शकली नाही. त्यानंतर बांधकाम विभागातील तत्कालीन अधिकाऱ्यांनी ३ (सी) अंतर्गत कारवाई करून कंत्राटदारास टर्मिनेट केले. यानंतर २००३ मध्ये जिल्हा परिषदेने केलेल्या कारवाईच्या विरोधात कंत्राटदाराने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने चोपडा कन्स्ट्रक्‍शनच्या बाजूने निकाल दिला. त्या निकालाविरोधात जिल्हा परिषद प्रशासनाने उच्च न्यायालयात अपील केले. हे प्रकरण काही मर्यादांमुळे उच्च न्यायालयातून परत पूर्वीच्या न्यायालयात आले. दरम्यान कंत्राटदाराने न्यायालयात एक्‍झिक्‍युशनची परवानगी मागितली. १५ जुलैला न्यायालयाने ही परवानगी देत कंत्राटदाराची आजवरची व्याजासह प्रलंबित असलेली ४३ लाख १७  हजार ६० रुपये वसुलीची परवानगी दिली. प्रशासनाने हा निधी जमा न केल्यास जप्तीच्या कारवाईची तरतूद आहे. बेलिफ संबंधित कंत्राटदारासह मंगळवारी (ता.१८) दुपारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात पोचले. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर अर्दड आंतरजिल्हा बदली समुपदेशन प्रक्रियेत होते. त्यांनी बांधकाम विभागाला या प्रकरणाची संचिका शोधून काढण्यास सांगितले. संचिकेची वाट पाहत बेलिफसह कंत्राटदार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात तीन तास थांबले; मात्र संचिका सापडली नाही. यामुळे श्री. आर्दड यांची खुर्ची, संगणक, तसेच संगणक सील करून जप्त करण्यात आले.

Web Title: aurangabad marathwada news zp ceo chair seized for recovery