पाणी आले; पण कमी दाबाने

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

औरंगाबाद - जायकवाडी येथील विद्युत उपकेंद्राच्या दुरुस्तीसाठी वीज वितरण कंपनीने घेतलेले बारा तासांचे शटडाऊन १६ तासांवर गेल्यामुळे शनिवारी (ता. १५) देखील शहराला पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागल्या. रात्री एकला वीज कंपनीचे दुरुस्तीचे काम संपल्यानंतर महापालिकेने पाणी उपसा सुरू केला. दुपारी बारापर्यंत पाण्याच्या टाक्‍या ५० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक भरल्या. दुपारनंतर काही वसाहतींचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला; मात्र नळांना कमी दाबाने पाणी आले, त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.  

पैठण येथील उपकेंद्रात वारंवार होणाऱ्या बिघाडामुळे महावितरण कंपनीने शुक्रवारी (ता. १४) सकाळी नऊ ते रात्री नऊ असा बारा तासांसाठी शटडाऊन घेण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार महापालिकेने तयारी करून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले. रात्री नऊनंतर शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत होईल, असा प्रशासनाचा अंदाज होता; मात्र, महावितरणतर्फे तब्बल एकपर्यंत दुरुस्ती सुरू होती. त्यामुळे शनिवारचेदेखील शहरातील पाण्याचे वेळापत्रक कोलमडले. रात्री एकला दुरुस्तीचे काम संपल्याने शहराकडे पाणी येण्यास शनिवारची सकाळ उजाडली. शहरात पाणी आल्यानंतर दुपारी बारानंतर काही वसाहतींना पाणीपुरवठा करण्यात आला. जलकुंभ पूर्णपणे भरलले नसल्याने कमी दाबानेच नळांना पाणी आले. जुन्या वेळापत्रकानुसार रविवारी ज्या वसाहतींचा पाणीपुरवठ्याचा टप्पा आहे, त्यांना सोमवारी पाणी मिळणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल, उपअभियंता आय. बी. खाजा यांनी दिली.  

व्हॉल्व्हला लिकेज
दोन दिवसांपासून पाण्याचे वेळापत्रक कोलमडलेले असतानाच फर्शीनाला येथे १४०० मिलिमीटर व्यासाच्या वाहिनीचा वॉल्व्हला गळती लागली. पाणीपुरवठा सुरू असताना दुपारी एक तास या व्हॉल्व्हची दुरुस्ती करण्यात आली. शुक्रवारीही शटडाऊनच्या काळात पाणी पुरवठा विभागाने फारोळ्यापासून शहरापर्यंत १० ठिकाणी लहान मोठ्या दुरुस्त्या केल्या. 

सिडकोत विजेचे सोंग
सिडको एन- पाच जलकुंभाचा वीजपुरवठा खंडित झाल्याने महापालिकेला अडचणीचा सामना करावा लागला. बारा वाजून दहा मिनिटांनी गुल झालेली वीज दुपारी साडेतीननंतर आली. दरम्यान, साडेतीन तास येथील पंप बंद होते. त्यामुळे एन-५ येथून पाणीपुरवठा होणाऱ्या वसाहतींचा पाणीपुरवठा विस्कळित झाला.

Web Title: aurangabad marathwada supply low pressure news water