एमआयएम नगरसेवक मतीन यांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला नकार देणारे औरंगाबादमधील एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना आज अटक करण्यात आली. त्यांना, मारहाण करणाऱ्या भाजपाच्या नगरसेवकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात भाजप नगरसेवक प्रमोद राठोड, राजगौरव वानखेडे, उपमहापौर विजय औताडे यांच्यासह अन्य दोन नगरसेवकांविरोधात जमावाने मारहाण कलाम 323, 506, 143, 147, 149 प्रमाणे सिटी चौक पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

औरंगाबाद- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला नकार देणारे औरंगाबादमधील एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना आज अटक करण्यात आली. त्यांना, मारहाण करणाऱ्या भाजपाच्या नगरसेवकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात भाजप नगरसेवक प्रमोद राठोड, राजगौरव वानखेडे, उपमहापौर विजय औताडे यांच्यासह अन्य दोन नगरसेवकांविरोधात जमावाने मारहाण कलाम 323, 506, 143, 147, 149 प्रमाणे सिटी चौक पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दरम्यान, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी मारहाण झाल्यानंतर मतीन यांना घाटीत दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला वार्ड 17 मध्ये उपचार घेत असलेल्या मतीन यांना गुन्हा दाखल झाल्यानंतर कैदी वार्डात शिफ्ट करन्यात आले. घाटीतुन सुटी करून त्यांना थोड्याच वेळात सिटी चौक पोलीस ठाण्यात आणण्यात येणार आहे. दरम्यान, पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. नगरसेवक सय्यद मतीनवर उपमहापौर विजय औताडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आल्याचे पीआय शिनगारे यांनी सांगितले आहे. 

तत्पूर्वी, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत "बाबरी पाडल्याची घटना आम्ही अद्याप विसरलेलो नाही,' असे वक्तव्य करणारे "एमआयएम'चे नगरसेवक सय्यद मतीन यांना महापालिकेच्या काल झालेल्या सर्वसाधारण सभेत बेदम मारहाण करण्यात आली होती. या घटनेनंतर मतीन यांना सर्वसाधारण सभेत कायमस्वरूपी बंदी घालण्याचा ठराव मंजूर करण्यात आला, तर नगरसेवकपद रद्द करण्यासाठी शासनाकडे शिफारस करण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रशासनाला दिले.

Web Title: aurangabad MIM corporator Matin arrested