औरंगाबाद : महापालिका आयुक्त पुन्हा येणार का?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

औरंगाबाद - महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक दोन आठवड्यापासून सुटीवर आहेत. रविवारी (ता. 10) त्यांची रजा संपली. त्यामुळे सोमवारी (ता. 11) कार्यालयात हजर राहतील, असा अंदाज बांधला जात होता; मात्र त्यांनी पुन्हा दहा दिवसांची रजा वाढविली आहे. दरम्यान, आयुक्त बदलीच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे ते परत येतील की नाही? याविषयी
उलट-सुलट चर्चा सध्या महापालिका वर्तुळात सुरू आहेत. प्रभारी आयुक्त म्हणून जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे पदभार होता; मात्र आयुक्तांच्या वाढीव सुटीनंतर नव्याने आदेश निघाले नसल्याने श्री. चौधरीही सोमवारी दिवसभर संभ्रमात होते. 

महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांचा कार्यकाळ वारंवारच्या सुटीमुळे वादग्रस्त ठरत आहे. कधी आजारी रजा तर कधी अभ्यास रजा घेऊन ते महापालिकेपासून दूरच राहण्याचा प्रयत्न करतात. शहरात असले तरी बहुतांशवेळा मुख्यालयात न येता डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रातूनच ते कारभार चालवितात. त्यामुळे महापालिका मुख्यालयात
अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कोणाचाच धाक नसल्याचे चित्र आहे.

दिवाळीपूर्वीच आयुक्तांनी सुटीवर जाण्याची तयारी केली होती; मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांची सुटी शासनाने नाकारली होती; पण निवडणुका संपताच त्यांनी दहा दिवसांची सुटी टाकली. त्यापूर्वी दिवाळीच्या पाच सुट्या होत्या. त्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून महापालिकेचा कारभार 'राजा'विनाच सुरू आहे. कारण आयुक्तांचा पदभार जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे देण्यात आला होता; पण ते एकदाही महापालिकेत फिरकले नाहीत. त्यामुळे महापालिकेत सध्या शुकशुकाटच होता. दरम्यान, रविवारी आयुक्तांची रजा संपली. त्यामुळे सोमवारी आयुक्त येणार असा अंदाज बांधून अधिकारी कामाला लागले होते; मात्र दुपारनंतर आयुक्तांनी आठ दिवसांची सुटी टाकल्याचे सांगण्यात आले. याबाबत दुपारपर्यंत प्रभारी आयुक्तांनाही माहिती नव्हती, असे सूत्रांनी सांगितले. 

हेही वाचा - महाराष्ट्रात कधी, का लागली होती राष्ट्रपती राजवट? जाणून घ्या... 

हृदयद्रावक : परतीच्या पावसाचा बळी, गेवराईत शेतकऱयाने संपवले जीवन

सडलेलं पीक बघून काळीज पिळवटून जातंय

कारण गुलदस्त्यात 
महापालिका निवडणुकी तोंडावर आल्यामुळे महापालिकेत आयुक्तच नसल्याने पदाधिकारी मात्र संतप्त आहेत. आयुक्तांनी सुटी का वाढविली याचे कारणही समोर आलेले नाही. आयुक्त बदलीच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे ते परत येतील की नाही? याविषयी उलट-सुलट चर्चा सध्या महापालिका वर्तुळात सुरू आहेत. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Municipal Commissioner on 10 days leave