औरंगाबाद महापालिकेचे ट्वेंटी-ट्वेंटी बजेट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जून 2019

औरंगाबाद : "आमदनी आठण्णी खर्चा रुपया"अशी महापालिकेची अवस्था झाली आहे. तिजोरीत वर्षाकाठी जेमतेम 600 ते 700 कोटी जमा होत असताना यंदा  अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाने दोन हजार कोटींचा आकडा गाठला आहे. शुक्रवारी (ता. 28) प्रशासनाने दोन हजार वीस कोटी रुपयांचे बजेट समितीला सादर केले. त्यात तब्बल 500 कोटी रुपये शासनाकडून अनुदान अपेक्षित धरण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे यंदा महापालिकेचे बजेट लांबणीवर पडले होते. त्यामुळे प्रशासनाने चार महिन्याचे लेखानुदान सादर करून त्यास मंजुरी घेतली होती. आचारसहिता संपली असल्याने शुक्रवारी स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात प्रशासनाने 2019-20 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर केले. त्यात 2020 कोटी 54 लाख रुपये तिजोरीत येतील तर  2019 कोटी 75 लाख रुपये खर्च होईल. 49 लाख रुपये शिल्लक राहतील.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Municipal Cormporation Budget