'बोहनी हो गई क्‍या' म्हणत पाच हजारांचा दंड

माधव इतबारे
बुधवार, 11 डिसेंबर 2019

महापालिका आयुक्तांनी पदभार घेतल्यापासून प्लॅस्टिक बंदी आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याचा फटका महापालिका अधिकारी व नगरसेविकेला बसला.

औरंगाबाद : महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्या कारवाईचा धडाका सुरूच असून, बुधवारी (ता. 11) प्लॅस्टिक कव्हरमध्ये पाव ठेवणाऱ्या हॉटेल चालकाला 'बोहनी हो गई क्‍या' असे म्हणत सकाळीच आयुक्तांनी पाच हजार रुपयांचा दंड ठोठाविला. विवेकानंद कॉलेज शेजारी हॉटेल साऊथ इंडियनवर ही कारवाई करण्यात आली.

महापालिका आयुक्तांनी पदभार घेतल्यापासून प्लॅस्टिक बंदी आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याचा फटका महापालिका अधिकारी व नगरसेविकेला बसला. दरम्यान आयुक्त सकाळीच पाहणीसाठी बाहेर पडत आहेत. बुधवारी त्यांनी त्यांनी निराला बाजार, समर्थनगर भागात पाहणी केली. विवेकानंद कॉलेज शेजारी प्लॅस्टिक कव्हरमध्ये पाव ठेवल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी हॉटेल चालकाला बोहनी झाली का? अशी विचारणा करत बंदी असलेले प्लॅस्टिक वापरल्याबद्दल तब्बल पाच हजार रुपयांचा दंड केला.

जाणून घ्या - कसा तयार होतो फाशीचा दोर?

यावेळी शहर अभियंता सखाराम पानझडे, उपायुक्त रवींद्र निकम, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एम. संधा, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, नगर रचना सहाय्यक संचालक रामचंद्र महाजन, सहाय्यक आयुक्त करणकुमार चव्हाण, उद्यान अधीक्षक विजय पाटील, उप अभियंता ख्वाजा, संजय कोंबडे, घनकचरा विभाग प्रमुख नंदकुमार भोंबे, शिक्षण विभागाचे ज्ञानदेव सांगळे यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Image result for aurangabad municipal corporation

बांधकामासाठी पाणी येते कुठून? 

आयुक्तांनी एका इमारतीच्या बांधकामांची पाहणी केली. बांधकामासाठी परवानगी आहे? पाणी कुठून घेता? असे प्रश्‍न आयुक्तांनी केले. बांधकाम परवानगी आहे मात्र नळ अद्याप घेतलेला नाही, असे आयुक्तांना सांगण्यात आले. त्यावर आयुक्तांनी बोअरवेलला परवानगी घेतली आहे का अशी विचारणा केली. आयुक्तांच्या या प्रश्नामुळे संबंधित अधिकारीही अचंबित झाले. आयुक्तांनी बोअरवेलसाठी देखील परवानगी घेणे गरजेचे असल्याचे सांगत तपासणी करण्याचे आदेश दिले.

...अन्यथा जागेवरच दंड 

पाहणी दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्यावर कचरा पडलेला आढळून आला. आयुक्तांनी घन कचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्याकडे विचारणा केली. त्यावर त्यांनी नागरिक रस्त्यावर कचरा टाकतात असे सांगितले. आयुक्तांनी महापालिका डोअर टू डोअर कचरा संकलन करते. कंपनीने योग्य पद्धतीने कचरा संकलन केले तर कचरा रस्त्यावर येण्याचा प्रश्‍नच नाही, असे सांगत त्यांनी भोंबे यांची खरडपट्टी काढली. कचरा संकलन योग्य पद्धतीने होत असताना नागरिक रस्त्यावर कचरा टाकत असतील तर स्पॉट फाइल करा, असे आदेश आयुक्तांनी दिले.

आयुक्त म्हणतात - तुम्हाला जागेवरच निलंबित करायला हवं पण...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Municipal Corporation Commissioner Fined Hotel Owner