विमानासाठी धोकादायक ठरणारे चार मोबाईल टॉवर महापालिकेने केले सील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

औरंगाबाद : चिकलठाणा विमानतळाला त्रासदायक ठरणार्या चार कंपन्यांच्या मोबाईल टॉवरला शनिवारी (ता.३१ ) सील केले.

विमानळाच्या आसपास आठ अनधिकृत मोबाईल टॉवर दिमाखात गेल्या काही दिवसांपासून उभे आहेत. विमानांच्या उड्डाण आणि लॅण्डिंगप्रसंगी पायलटला या टॉवरचा अनेक वेळा त्रास सहन करावा लागत आहे. अनधिकृत मोबाईल टॉवर त्वरित हटविण्यात यावेत, अशी विनंती प्राधिकरणाने अनेकदा महापालिकेकडे केली. प्रशासनाने या पत्रांना दाद दिली नव्हती.

बुधवारी (२८) एका बैठकीत हा प्रकार समोर आला होता. शहरात ४७१ मोबाईल टॉवर असून, त्यातील फक्त ८७ टॉवरला परवानगी असून, इतर सर्व अनधिकृत असल्याचा धक्कादायक खुलासाही अग्निशमन अधिकारी आर.के. सुरे यांनी केला केला होता. दरम्यान शनिवारी दुपारी चार टॉवर सील करण्यात आल्याने या कंपन्याच्या सेवा ठप्प झाल्या आहेत.

Web Title: Aurangabad Municipal corporation sealed four mobile towers