महापौर निवडीचे गुऱ्हाळ सुरूच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 डिसेंबर 2016

औरंगाबाद - उमदेवारी अर्ज भरण्यासाठी काही तासांचा अवधी शिल्लक राहिलेला असतानाही भाजपामध्ये उमेदवार कोण या विषयावरून चर्चेचे गुऱ्हाळ शुक्रवारी (ता.नऊ) रात्रीपर्यंत सुरुच होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शनिवारी (ता.दहा) सायंकाळी पावणेसहापर्यंत आहे. यामुळे इच्छुकांच्या हृदयाची धडधड वाढली आहे.

औरंगाबाद - उमदेवारी अर्ज भरण्यासाठी काही तासांचा अवधी शिल्लक राहिलेला असतानाही भाजपामध्ये उमेदवार कोण या विषयावरून चर्चेचे गुऱ्हाळ शुक्रवारी (ता.नऊ) रात्रीपर्यंत सुरुच होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शनिवारी (ता.दहा) सायंकाळी पावणेसहापर्यंत आहे. यामुळे इच्छुकांच्या हृदयाची धडधड वाढली आहे.

भाजपकडून महापौरपदासाठी राजू शिंदे, बापू घडामोडे, विजय औताडे, ऍड. माधुरी अदवंत, राजगौरव वानखेडे, शिवाजी दांडगे, प्रमोद राठोड, रामेश्वर भादवे या इच्छुकांची नावे चर्चेत आहेत. उमेदवारी कोणाला द्यायची यावरुन प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा अध्यक्षांचा गट यात ओढाताण सुरु असल्याची माहिती मिळाली. रावसाहेब दानवे हे विजय औताडे किंवा राजगौरव वानखेडे यांच्यासाठी तर हरिभाऊ बागडे हे राजू शिंदे यांच्यासाठी अनुकूल असल्याची चर्चा आहे.

औरंगाबाद, मुंबई, नागपूरमध्ये बैठका होऊन कोणाची महापौरपदी वर्णी लावायची याचा काथ्याकुट झाला, मात्र नावावर एकमत होत नाही. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही तासांचा अवधी राहिल्याने वरिष्ठांना निर्णय घ्यावा लागणार आहे.

इच्छुकांची धडधड वाढली
महापौर पदावर राजू शिंदे, बापू घडामोडे की अन्य कोणाची वर्णी लागणार याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेने पदाधिकारी जाहीर करताना नव्यांना संधी दिली होती. भाजपानेही हेच सूत्र लागू केले तर विजय औताडे, राजगौरव वानखेडे, रामेश्वर भादवे, शिवाजी दांडगे, प्रमोद राठोड यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. शिवसेनेने उपमहापौरपदी महिलेला संधी दिली. भाजपनेही महिलेला संधी देण्याचा विचार केला तर इच्छुकांमध्ये ऍड. माधुरी अदंवत यांना संधी मिळेल. पक्षातील ज्येष्ठतेचा विचार केला तर बापू घडामोडेंना आणि विधानसभाध्यक्षांचे म्हणणे मान्य झाले तर राजू शिंदे यांना महापौरपदाची संधी मिळू शकते. संधी आपल्यालाच मिळावी यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत, उलगडा मात्र शनिवारी (ता.दहा) होण्याची शक्‍यता सूत्रांनी व्यक्‍त केली.

Web Title: aurangabad municipal mayor selection