कचराकोंडीमुळे औरंगाबाद महापालिका बरखास्त करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

औरंगाबाद - कचराकोंडीला ६१ दिवस पूर्ण झाले तरी महापालिकेला अद्याप तोडगा काढला नसल्याने औरंगाबाद कनेक्ट टीमच्या माध्यमातून मंगळवारी (ता.१७) गार्बेज वॉक काढण्यात आला. महापालिका बरखास्त करण्याची मागणी करत नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

शहराच्या कचराकोंडीला मंगळवारी 61 दिवस पुर्ण झाले. मात्र, ही समस्या अद्यापही कायम आहे. कचराकोंडी फोडण्यात महापालिका अपयशी ठरत आहे. महापालिकेच्या या निष्क्रीय कारभाराचा निषेध करण्यासाठी ‘गार्बेज वॉक’चे आयोजन करण्यात आले होते. सकाळी नऊ वाजता पैठणगेट येथील गोविंदभाई श्रॉफ यांच्या पुतळ्यापासून वॉकला सुरवात झाली. महापालिका बरखास्त करा अशी मागणी करत महापालिका प्रसनाविरूद्द रोष व्यक्त करीत आपल्या मागण्या महापौरांसमोर मांडल्या. 

यावेळी आमदार सुभाष झांबड, समीर राजुरकर,सय्यद अक्रम, रश्मी बोरीकर, जितेंद्र देहाडे, सुभाष लोमटे यांच्यासह शेकडो नागरिक, औरंगाबाद कनेक्टचे सभासदांचा सहभाग होता. ३० एप्रिलपर्यंत रस्त्यावरील कचरा उचलण्याचे यावेळी आश्वासन देण्यात आले.

Web Title: Aurangabad municipality Dismissal