नगर रस्त्यावरील डिझाईन महिनाभरात मिळण्याची अपेक्षा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

औरंगाबाद - औरंगाबाद-नगर रस्त्यावरील छावणी परिसरातील रेल्वे ओव्हरब्रिजच्या विस्ताराचा खर्च आता १९ कोटींवरून २२ कोटींवर गेला आहे. या वाढीव तीन कोटींची मागणी शासनदरबारी करण्यात आली असून, त्यासाठी स्मरणपत्रे आणि पाठपुराव्याचा सिलसिलाही सध्या सुरू असून, हा वाढीव निधी कधी प्राप्त होणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. 

औरंगाबादेतून नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रेल्वे ओव्हरब्रिज सध्या केवळ दुपदरी आहे. याचे चौपदरीकरण करण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. पुलाची खिंड झाल्याने येथे जड वाहनांमुळे अनेकदा कोंडी तयार होते. त्याला छेद देण्यासाठी या पुलाचे आवश्‍यक रुंदीकरण लगतचा रस्ता सहा पदरी झाला तरी प्रलंबित आहे. रुंदीकरणाचे काम रेल्वे करणार असल्याने त्यासाठी आवश्‍यक पैसे रेल्वेकडे भरावयाचे आहेत. या पुलाचा खर्च आता २२ कोटींवर गेल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातील सूत्रांनी दिली. 

या महिन्याच्या शेवटीपर्यंत रेल्वे विभागाकडून डिझाईन प्राप्त झाल्यावर निविदा प्रक्रियेस सुरवात होण्याची आशा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वर्ल्ड बॅंक डिव्हिजनला आहे.

रेल्वेकडे करावा लागणार तीन कोटींचा भरणा 
औरंगाबाद शहरातून दरदिवशी वाळूज औद्योगिक वसाहत, बजाजनगर, वडगाव कोल्हाटी आदी ठिकाणी असलेल्या रहिवासी आणि औद्योगिक वसाहतींचा राबता या रस्त्याने आहे. या पुलाचे डिझाईन रेल्वे विभागाकडून अद्याप प्राप्त झालेले नाही. हे डिझाईन महिनाभरात मिळण्याची आशा सार्वजनिक बांधकाम विभागाला आहे. ते आल्यावर राज्याला रेल्वेकडे तीन कोटींचा भरणा करावा लागणार आहे. 

Web Title: aurangabad nagar road design expected within a month