कॉंग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचाही राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

औरंगाबाद : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे मंगळवारी (ता.20) त्यांनी राजीनामापत्र सुपुर्द केले. 

जिल्ह्यातील गंगापुर, खुलताबाद, कन्नड आणि पैठण नगरपालिकांच्या निवडणुकींचा सोमवारी (ता.19) निकाल लागला. कॉंग्रेस पक्षाचे दोन नगराध्यक्ष निवडून आल्यानंतरही आमदार अब्दुल सत्तार यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सहकार्य न केल्याचा आरोप करीत सोमवारी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

याच निवडणुकींमध्ये राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळू शकले नाही. गंगापूर नगरपालिकेत एकही जागा पक्षाला मिळाली नसली तरी कन्नड नगरपालीकेत एक, खुलताबादला दोन तर पैठणला सहा जागा मिळाल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर वैजापूरचे आमदार आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब चिकटगावकर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत मंगळवारी सकाळी मुंबई येथे प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला.

यासंदर्भात आमदार चिकटगाकर यांना विचारले असता त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले. नगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळू शकले नाही. पक्षाचा जिल्हाध्यक्ष या नात्याने मी या अपयशाची जबाबदारी स्वीकारली असून आज सकाळीच प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा दिला आहे. अशी माहिती त्यांनी दिली. 

Web Title: aurangabad ncp district president resigns