मोकाट कुत्र्यांसाठी 25 लाखांचा खर्च 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

औरंगाबाद - कचऱ्यामुळे मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आणि सर्वसामान्य नागरिकांना, वाहनधारकांना मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढू लागला. यामुळे महापालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी या आर्थिक वर्षात 25 लाख रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पुणे येथील ब्ल्यू क्रॉस या संस्थेला काम देण्यात येणार असून, यासंदर्भात मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठराव ठेवण्यात येणार आहे. 

मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांचे निर्बिजीकरण करण्यात येणार आहे. यासाठी मोकाट कुत्र्यावर उपचार करण्यासाठी प्रत्येकी 900 रुपये तर पिसाळलेल्या, धोकादायक बनलेल्या मोकाट कुत्र्याला दया मरण देण्यासाठी प्रत्येकी 300 रुपये महापालिका प्रशासन संबंधित संस्थेला देणार आहे. 2018 - 19 या आर्थिक वर्षात मोकाट कुत्र्यांवर 25 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव शनिवारी (ता. 7) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. 

प्रत्येक कुत्र्यामागील खर्च 
900 रुपये  - उपचारासाठी 
300 रुपये  - दयामरणासाठी 
25 लाख रुपये  - वार्षिक तरतूद 

Web Title: aurangabad news 25 lakhs for street dogs