‘बिमटा’चे ३९ उद्योजक चीनच्या दौऱ्यावर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

औरंगाबाद - बुद्धिस्ट इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्‍चर्स ॲण्ड असोसिएशनचे (बिमटा) ३९ लघुउद्योजक केंद्र सरकारच्या उद्योग विभागामार्फत रविवारी (ता. १५) चीनच्या पाचदिवसीय दौऱ्यावर रवाना झाले आहेत. 

औरंगाबाद - बुद्धिस्ट इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्‍चर्स ॲण्ड असोसिएशनचे (बिमटा) ३९ लघुउद्योजक केंद्र सरकारच्या उद्योग विभागामार्फत रविवारी (ता. १५) चीनच्या पाचदिवसीय दौऱ्यावर रवाना झाले आहेत. 
या दौऱ्यादरम्यान ते गॉन्झाव्ह या शहरामधील कॅन्टॉन फेअर २०१८ येथील जागतिक दर्जाच्या इंजिनिअरिंग मशीन टूल्स प्रदर्शनाला भेट देतील. या प्रदर्शनाच्या माध्यमाने तेथील कुशल तंत्रज्ञान व आधुनिकतेचा वापर करून तयार होणाऱ्या उत्पादनांचे व उत्पादन बनवणाऱ्या कंपनीचे विविध प्रकारचे मशीन व तंत्रज्ञानाचा अभ्यास करून त्याचा वापर आपल्या उद्योगात कसा करता येईल, यादृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर रत्नपारखे यांनी दिली. हे प्रदर्शन १५ ते १९ एप्रिलदरम्यान होत असून, पुढील तीन दिवस आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती करून घेण्यासाठी चीनमधील विविध उद्योगांना भेट देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

असे आहे शिष्टमंडळ 
चीनला रवाना झालेल्या या शिष्टमंडळात नंदकिशोर रत्नपारखे, मच्छिंद्र ओहळ, सिद्धार्थ जाधव, दुष्यंता आठवले, विनोद अवसरमल, प्रमोद भोसले, विठ्ठल भुरे, रवी चाबूकस्वार, सुभाष चांदणे, सिद्धार्थ दीपके, मारुती गायकवाड, कडुबा गवई, बलराज जाधव, विलास जाधव, अमोल जावळे, कैलास कांबळे, मिलिंद काशिदे, संदीप केदारे, रवीकुमार खैरनार, भुजंग खिल्लारे, सुभाष खोसरे, संतोष लाटे, सुभाष मोरे, जितेंद्र मुदिराज, सुमित नरवडे, साहेबराव निकाळे, रामचंद्र पठारे, प्रमोद राऊत, ईश्‍वर सुतार, कमलेश तायडे, हर्षानंद तायडे, मिलिंद थोरात, रवी वसाटे, उत्तम वाकडे, शिवाजी गांगुर्डे, विठ्ठल गोडसे, राजू निळे, प्रभाकर सुभे, एकनाथ पवार यांचा समावेश आहे. 

Web Title: aurangabad news 39 Small Businessmen of the Buddhist Industrial Manufacturers and Exporters Association Visit to China