औरंगाबाद: भरधाव मोटारीने चौघांना चिरडले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

औरंगाबादमधील चिखलठाणा परिसरात राहत असलेले चौघेजण नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेले असताना त्यांना भरधाव मोटारीने चिरडले. या अपघातात भागीनाथ लिंबाजी गवळी (वय 56), नारायण गंगाराम वाघमारे (वय 65), दगडुजी बालाजी ढवळे (वय 65) आणि अनिल विठ्ठल सोनवणे (वय 45) यांचा जागीच मृत्यू झाला.

औरंगाबाद - मॉर्निंग वॉकला गेलेल्या काही जणांना भरधाव मोटारीने चिरडल्याची घटना आज (शनिवार) सकाळी जालना रोडवरील केंब्रिज शाळेजवळ घडली. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादमधील चिखलठाणा परिसरात राहत असलेले चौघेजण नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेले असताना त्यांना भरधाव मोटारीने चिरडले. या अपघातात भागीनाथ लिंबाजी गवळी (वय 56), नारायण गंगाराम वाघमारे (वय 65), दगडुजी बालाजी ढवळे (वय 65) आणि अनिल विठ्ठल सोनवणे (वय 45) यांचा जागीच मृत्यू झाला. दोघे जण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

या चौघांना चिरडल्यानंतर मोटार चालक घटनास्थळाहून पळून गेला. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, चौकशी करण्यात येत आहे. औरंगाबादहून जालन्याकडे जाणाऱ्या मोटारीने या चौघांना सकाळी साडेसहाच्या सुमारास चिरडले. 

Web Title: Aurangabad news 4 people dead on accident