वर्षाला ४४ कोटींचा कर भरतो, परत काय मिळते? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

औरंगाबाद - चिकलठाणा औद्योगिक वसाहत मालमत्ता करापोटी प्रतिवर्षी ४४ कोटी रुपये महापालिकेला देते. या बदल्यात येथील उद्योजकांना काय सुविधा मिळतात, असा सवाल ‘मसिआ’चे नवनिर्वाचित अध्यक्ष किशोर राठी यांनी केला. भविष्यात औद्योगिक वसाहतींसाठीच्या पायाभूत सुविधांचा लढा तीव्र करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. 

मराठवाडा असोसिएशन फॉर स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरच्या (मसिआ) नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. २४) ‘सकाळ’ कार्यालयाला भेट दिली. 

चिकलठाणा औद्योगिक वसाहत ही विमानतळ, मॉल, शहरी भाग यांच्याशी जोडलेली आहे. या भागाला आयटी उद्योगाशी किंवा सेवा क्षेत्रात कार्यरत कंपन्यांशी जोडणे शक्‍य आहे;  पण पायाभूत सुविधांचा अभाव या क्षेत्राचे चित्र अधिक बकाल करतात. साधे रस्तेही धड नसल्याचे त्यांनी सांगितले.

वातावरण बिघडले, उद्योग कसे येणार?
औरंगाबाद शहराचे असलेले वातावरण औद्योगिक वृद्धीला मारक ठरते आहे. सामाजिक वातावरणाची चर्चा मोठ्या प्रमाणावर होत असताना उद्योग येथे येण्यासाठी कसे तयार होतील, असा प्रश्‍न मसिआ टीमने उपस्थित केला. उद्योग आला तरी त्यांच्या ॲन्सीलरी कशा स्थापन करायच्या हाही प्रश्‍न असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

शेतकऱ्यांसाठी  कौशल्यावर  आधारित कार्यक्रम
मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या कौशल्यात आणि त्यांच्या उत्पन्नवाढीसाठी मसिआ यंदा विशेष कार्यक्रम राबविणार असल्याचे अध्यक्ष राठी यांनी सांगितले. मराठवाड्यात सोयाबीनच्या उत्पादनात सातत्याने वाढ होत असताना त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग आपल्याकडे नाहीत. हे अंतर भरून काढण्यासाठी मसिआ कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: aurangabad news 44 crores tax annually says kishor rathi