आधार कार्डावर होणार फ्लॅट खरेदी-विक्री 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - प्लॉट, फ्लॅट खरेदी- विक्री व्यवहाराची नोंदणी करण्यासाठी सोबत दोन साक्षीदार आणावे लागतात. आगामी काळात ही अट रद्द करण्यात येणार आहे. त्याऐवजी खरेदी-विक्री करणाऱ्यांचे आधार कार्ड आवश्‍यक ठरणार आहे. त्यामुळे साक्षीदार आवश्‍यक राहणार नाहीत. 15 ऑक्‍टोबरपासून ही सुविधा सुरू करण्याचा विचार राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक अनिल कवडे यांनी व्यक्त केला. 

औरंगाबाद नोंदणी विभागात बुधवारी कवडे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की मुद्रांक शुल्क विभागात राज्य सरकारतर्फे वेगवेगळ्या ऑनलाइन सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे सरकारला महसुलात किती फायदा होतो, यापेक्षा नागरिकांना त्याचा किती चांगला फायदा होतो, यावर आम्ही भर दिला आहे. ई-सुविधांद्वारे नोंदणी कार्यालयातील नोंदणीच्या पद्धतीत सुलभता आणता येणार आहे. 

मुद्रांक कार्यालयात नोंदणी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना कमीत कमी वेळ कार्यालयात लागेल, अशी यंत्रणा राबविण्याचा आमचा प्रयत्न आहे. नागरिकांच्या सोयीसाठी ई-मूल्यांकन, ई-विवाह नोंदणी या सुविधा येत्या महिनाभरात सुरू होणार आहेत. शिवाय नोंदणी करण्यासाठी आगाऊ नोंदणी करून वेळ व तारीखही घेता येणार आहे. नागरिकांनी ई -सुविधांचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. 

आठ हजार कोटींची मुद्रांक वसुली 
नोटाबंदीनंतर सुरवातीचे चार महिने मुद्रांक शुल्क वसुलीवर मोठा परिणाम झाला. मात्र त्यानंतर परिस्थिती सुधारत आहे. गेल्या वर्षी 179 कोटी रुपये एवढी वसुली असताना यंदा औरंगाबाद विभागात आतापर्यंत 176 कोटींची वसुली झाली आहे. दरम्यान, राज्यात यंदा 21 हजार 26 कोटी रुपयांचे मुद्राक शुल्क वसुलीचे उदिष्ट आहे. आतापर्यंत 20 ऑगस्टपर्यंत 8009 कोटी रुपयांचे मुद्राक शुल्क वसूल झाली असल्याचे कवडे यांनी या वेळी स्पष्ट केले.

Web Title: aurangabad news aadhar card Flat-sale