बस-टेंपोच्या अपघातात दोघे गंभीर जखमी  

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

चित्तेपिंपळगाव -  धुळे-सोलापूर महामार्गावर निपाणी फाट्यावर (ता. औरंगाबाद) भरधाव एसटी बस व टेंपोच्या धडकेत बुधवारी (ता.२७) दोनजण गंभीर जखमी झाले. त्यांची नावे कळाली नाहीत. बीडकडून औरंगाबादकडे भरधाव जाणाऱ्या बसने (एमएच २० बीएल २५५६) चित्तेपिंपळगावकडे जाणाऱ्या दूध वाहतुकीच्या टेंपोला (एमएच २० डब्ल्यू ६५६९) धडक दिली. यात टेंपोचा चुराडा होऊन चालक, क्‍लीनर गंभीर जखमी झाले, तर बसचालक व दहा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणाचा तपास श्री. ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून बसचालकावर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: aurangabad news accident