औरंगाबाद : आळंद येथे टेम्पोची कारला धडक; 1 गंभीर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

एक जण गंभीर : तीन जणांना किरकोळ दुखापत

आळंद : औरंगाबाद - सिल्लोड रोडवर आळंद येथून एक किलोमीटर अंतरावर बळीराजा पेट्रोल पंपासमोर दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात टेम्पो व कारची समोरासमोर धडक झाली. त्यात एकजण गंभीर जखमी झाला, तर तीनजणांना किरकोळ दुखापत झाली.

संजय सोनवणे (वय 50, रा. भुसावळ) हे आपल्या कुटुंबासोबत कारमधून (MH 28 V 6323) सिल्लोडकडून औरंगाबादकडे जात होते. त्यावेळी खुलताबाद येथून विटा घेऊन येणाऱ्या टेम्पो (MH 20 CT 7692) हा दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात बळीराजा पेट्रोल पंपासमोर दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाली. 

यामध्ये टेम्पोचालक गणेश गणळे (वय 30) हे गंभीर जखमी झाले असून, स्थानिकांच्या मदतीने त्यांना पुढील उपचारासाठी घाटी येथे पाठवण्यात आले.

Web Title: aurangabad news accident one seriously injured

फोटो गॅलरी