वकील परिषदेच्या निवडणूक तयारीला वेग 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

औरंगाबाद - महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेची निवडणूक 30 मार्चपूर्वी घेण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेशित केले आहे. त्यानुसार दोन्ही राज्यांतील इच्छुकांनी निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली असून, उमेदवारांनी विविध जिल्ह्यांत दौरे सुरू केले आहेत. या निवडणुकीत एक लाख दहा हजार वकील मतदार आपला हक्क बजावतील. दोन राज्यांत 430 वकील संघ आणि एक लाख 60 हजार सदस्य आहेत. मागील निवडणूक 2010 मध्ये झाली होती. त्यानंतर निवडणूक ही 2015 मध्ये होणे गरजेचे होते. या वर्षी सनद पडताळणी नियम अमलात आल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उमेदवार आणि सदस्यांची पडताळणी करून घेण्यात आली.

औरंगाबाद - महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेची निवडणूक 30 मार्चपूर्वी घेण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेशित केले आहे. त्यानुसार दोन्ही राज्यांतील इच्छुकांनी निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली असून, उमेदवारांनी विविध जिल्ह्यांत दौरे सुरू केले आहेत. या निवडणुकीत एक लाख दहा हजार वकील मतदार आपला हक्क बजावतील. दोन राज्यांत 430 वकील संघ आणि एक लाख 60 हजार सदस्य आहेत. मागील निवडणूक 2010 मध्ये झाली होती. त्यानंतर निवडणूक ही 2015 मध्ये होणे गरजेचे होते. या वर्षी सनद पडताळणी नियम अमलात आल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उमेदवार आणि सदस्यांची पडताळणी करून घेण्यात आली. निवडणूक कार्यक्रम फेब्रुवारीत जाहीर करण्यात येणार आहे.

Web Title: aurangabad news advocate Council election