कोरेगाव भीमा घटनेनंतर तणाव; औरंगाबाद शहरात दगडफेक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

दगडफेकीच्या घटनेमुळे पोलिसांनी आश्रुधूुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवले, त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे. टीव्ही सेंटर व संपुर्ण परिसरात प्रचंड पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मयूरनगर व परिसरातही मोठा जमाव रस्त्यावर आल्याने तणाव निर्माण झाला. या अनुशंगाने शहरात जमावबंदी लागू करण्यात आल्याची घोषणा करुन शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांनी ध्वनीक्षेपकावरुन केले आहे

औरंगाबाद : भिमाकोरेगाव येथील घटनेनंतर मंगळवारी शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. टीव्ही सेंटर भागातील सिद्धार्थनगर परिसरात सकाळी आकरा वाजेच्या सुमारास जमावाने दगडफेक केली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला, व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. जमावाने पोलिसांच्या वाहनांवरही दगडफेक केल्याने एक- दोन पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दगडफेकीच्या घटनेमुळे पोलिसांनी आश्रुधूुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवले, त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे. टीव्ही सेंटर व संपुर्ण परिसरात प्रचंड पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मयूरनगर व परिसरातही मोठा जमाव रस्त्यावर आल्याने तणाव निर्माण झाला. या अनुशंगाने शहरात जमावबंदी लागू करण्यात आल्याची घोषणा करुन शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांनी ध्वनीक्षेपकावरुन केले आहे.

शहरातील विविध भागात जमाव रस्त्यावर येत असून, पोलिसांनी परिस्थितीच्या पार्श्‍वभुमीवर प्रचंड बंदोबस्त तैनात केला आहे. दगडफेकीच्या घटनांच्या अनुशंगाने मध्यवर्ती बसस्थानक व सिडको बसस्थानकातून पोलिस बंदोबस्तात गाड्या शहराच्या बाहेर काढण्यात येत होत्या.

Web Title: aurangabad news: agitation