विमानतळ विस्तारीकरणाच्या कामाला वेग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

औरंगाबाद - विमानतळ विस्तारीकरणासाठी लवकरात लवकर भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सोमवारी (ता. १०) अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर बुधवारी (ता. १२) विभागीय आयुक्‍तांसोबत महत्त्वाची बैठक होणार आहे. या कामाला आता वेग येत असल्याचे स्पष्ट होत आहे.

या संबंधी विमानतळावर सोमवारी बैठक घेण्यात आली. विमानतळाचे विस्तारीकरण करण्यासाठी भूसंपादनाची लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. विमानतळ विस्तारीकरणासाठी १८२ एकर जमिनीची आवश्‍यकता आहे. त्याकरिता महानगरपालिका, सिडको आणि प्रशासनाच्या जमिनीचा समावेश आहे. विस्तारीकरणासाठी सर्वेक्षण करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आले असून, अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी करून अहवाल सादर केला. त्यानंतर विमानतळावर सोमवारी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची बैठक झाली. महापालिका, सिडको आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. विमानतळाचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला एजन्सी म्हणून काम करावे लागणार आहे. सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून, २९ लाख रुपयांचा निधी जमा करण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

Web Title: aurangabad news airport