महापौरांनी फुगविले ३८८ कोटींनी बजेट 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

औरंगाबाद  - तिजोरीत खडखडाट असताना महापालिका पदाधिकारी मात्र बजेटमध्ये शेकडो कोटींची वाढ करीत आहेत. २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये स्थायी समितीने गेल्या महिन्यात २०० कोटी ५० लाख रुपयांची वाढ केल्यानंतर आता महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोमवारी (ता. ११) बजेट अंतिम करताना तब्बल ३८८.८० कोटींची वाढ केली. त्यामुळे बजेट यंदा विक्रमी १,८६४ कोटी ८० रुपयांवर गेले. वास्तविक महापालिकेचे आर्थिक उत्पन्न तीनशे ते चारशे कोटींच्या घरात आहे.

महापालिकेचे चालू आर्थिक वर्षाचे बजेट स्थायी समितीने २९ एप्रिलला सर्वसाधारण सभेला सादर केले होते. प्रशासनाने तयार केलेल्या अंदाजपत्रकात तब्बल २०० कोटी ५० लाख रुपयांची वाढ केल्याने १,४७५ कोटी ८७ लाखांवर बजेट पोचले होते. त्या वेळी सदस्यांनी बजेटचा अभ्यास करण्यासाठी वेळ मागितला होता. त्यानंतर दोन महिन्यांनी सोमवारी अर्थसंकल्पीय विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. तब्बल सहा तास चाललेल्या या बैठकीत वरिष्ठ सदस्यांनी महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी अनेक सूचना केल्या. त्यानंतर सायंकाळी बजेट अंतिम करताना महापौरांनी त्यात तब्बल ३८८ कोटी ८० लाख वाढ करताना प्रशासनाला उत्पन्नवाढीचे उद्दिष्ट वाढवून दिले. १,८६४.८० कोटी जमा व १,८६३.२० कोटी रुपये खर्च असे १ कोटी ६० लाख रुपये शिलकीचे बजेट मंजूर करण्यात आले.  

ठळक बाबी
दिव्यांगांसाठी उद्यान - ५ कोटी  
मोकाट जनावरांसाठी प्राणिसंग्रहालय - ३० कोटी
गरवारे क्रीडा संकुल व स्वीमिंग पूल - २० कोटी 
बौद्ध लेणी मार्ग विकसित करणे - २ कोटी
चार स्मार्ट रोड 
विकसित करणे - १५ कोटी 
समांतर पाणीपुरवठा 
योजना - ५० कोटी 
भूमिगत गटार 
योजना - ५० कोटी 
महापालिका शाळा इमारतींसाठी - १० कोटी 
घनकचरा - १३ कोटी

Web Title: aurangabad news amc